खळबळजनक : आई - वडीलांची तरुण मुलासोबत विहीरीत उडी घेवून आत्महत्या #suicide - Khabarkatta ✒ खबरकट्टा

                     Khabarkatta  ✒ खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'

खळबळजनक : आई - वडीलांची तरुण मुलासोबत विहीरीत उडी घेवून आत्महत्या #suicide

Share This
खबरकट्टा /गडचिरोली :  




आई - वडील व मुलाने विहीरीत उडी घेवून आत्महत्या केल्याची खळबळजनक घटना गडचिरोली शहरात उघडकीस आली आहे. 

रविंद्र नागोराव वरगंटीवार (५०), वैशाली नागोराव वरगंटीवार (४३) आणि साईराम रविंद्र वरगंटीवार (१९) रा. विवेकानंदनगर गडचिरोली अशी आत्महत्या केलेल्यांची नावे आहेत. सेमाना बायपास मार्गावरील आनंदनगर परिसरातील एका शेतातील विहिरीत या तिघांचेही मृतदेह आढळून आले आहेत.   

काल ९ फेब्रुवारी रोजी रविंद्र वरगंटीवार यांची मुलगी आपल्या प्रियकरासोबत पळून गेल्याची चर्चा असून  यामुळे खचलेल्या अवस्थेत असलेल्या वरगंटीवार परीवाराने बदनामीच्या भीतीपोटी सामुहिक आत्महत्या केल्याचे नागरिकांमधून बोलल्या जात आहे.  घटनेचा तपास गडचिरोली पोलिस करीत आहेत.