विवाहित तरुणीची गळफास घेऊन आत्महत्या #suicide - Khabarkatta ✒ खबरकट्टा

           Khabarkatta ✒ खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'

विवाहित तरुणीची गळफास घेऊन आत्महत्या #suicide

Share This
खबरकट्टा / चंद्रपूर :

सिंदेवाही पोलीस स्टेशनचे हद्दीत गुरूदेव चौक सिंदेवाही येथील रहिवासी अश्विनी अजय मडावी हिने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे उघडकीस आले आहे 

अजय मडावी हा पत्नी अश्विनी सोबत राहात होता. मृतक महिलेचे वय २० वर्षे असुन तिला एक लहान मुलगा सुद्धा आहे. घोषणेच्या दिवशी मृतक आणि पतिमध्ये भाजी बनविण्याचे शुल्लक कारणांमुळे दोघांमध्ये वाद झाल्याचे कळते. 

पत्नीने भाजी बनविण्यास नकार दिल्याने विजय हा आपल्या दुकानात परत गेला. व रात्री ८-०० वाजता घरी परत आला. तेव्हा पत्नीने स्वयंपाक बनविला नसल्याचे लक्षात आल्याने तसाच उपवाशी झोपला.रात्री ९-३० वाजताचे दरम्यान लहान मुलाचे रडन्याचे आवाजाने उठून पत्निकडे गेला असता, झोपल्या जागेवर पत्नी दिसून न आल्याने स्वयंपाक खोलीत जाऊन पाहिले असता, लाकडी फाट्याला दोरी बांधून गळफास घेऊन अश्विनी लटकलेल्या स्थितित आढळून आल्याने अजयचे एकदम ओरडण्याचे आवाजाने घराशेजारील लोक धाऊन आले. 

त्यानंतर  अजयने सुरेश मडावी याचे मदतीने अश्विनी ला खाली ऊतरवून, लगेच ग्रामीण रुग्णालय सिंदेवाही येथे हलविण्यात आले. तेथील डॉक्टरांनी तपासणी करून अश्विनी ला मृत घोषित केले. पती अजयचे तोंडी बयानावरून सिंदेवाही पोलीसांनी तक्रार दाखल करून अपराध क्र. ०३/२०२० कलम १७४ नुसार मर्ग दाखल केला. ग्रामीण रुग्णालयातील डॉक्टरांनी शव विच्छेदन करूण शव नातेवाईकांना सोपविण्यात आले असुन पुढील तपास सिंदेवाही पोलीस करीत आहेत.