चंद्रपूर ब्रेकिंग : कृषक विद्यालयातील विद्यार्थ्याची वर्गखोलीत गळफास घेऊन आत्महत्या #suicide - Khabarkatta ✒ खबरकट्टा

                     Khabarkatta  ✒ खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'

चंद्रपूर ब्रेकिंग : कृषक विद्यालयातील विद्यार्थ्याची वर्गखोलीत गळफास घेऊन आत्महत्या #suicide

Share This
खबरकट्टा / चंद्रपूर :


ब्रम्हपुरी येथील कृषक विद्यालयातील विद्यार्थ्याची वर्गखोलीत गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना आज दिनांक 2 फेब्रुवारी ला उघडकीस आल्याने शैक्षणिक क्षेत्रात खडबड उडाली आहे. मृतक विद्यार्थ्याचे नाव लिखित रवींद्र बुराडे वय (१८) रा. चौगाण असे तपासात उघड झाले असून त्याने आत्महत्या करण्यापूर्वी फलकावर सॉरी प्रिन्सिपल सर असा मजकूर लिहून ठेवला आहे.

सविस्तर वृत्तानुसार लिखित हा साध्या स्वभावाचा  कोणासोबतही मैत्री एकटाच राहत होता कमी बोलणारा होता. शाळेतील संरक्षण भिंतीवरून कवलारू असलेल्या शाळे च्या इमारतीवरून चढून लगतच असलेल्या सिमेंटच्या इमारती प्रवेश केला व सदर इमारतीत प्रवेश करण्याच्या मार्गाला आतून त्यांनी तारांनी घेतला बांधले आधीच्यात्या इमारती ला जाण्यासाठी असलेल्या गेटला कुलूप लावलेला होता. 

वर्गखोली प्रवेश करून बेंचेस एकावर एक मांडून सिलिंग फॅन ला दोरीने गळफास लावून आत्महत्या केली. त्याच्याआधी त्यांनी वर्ग खोलीतील फलकावर सॉरी प्रिन्सिपल सर असा मजकूर लिहून ठेवला होता. काल सुट्टी असल्याने आज सकाळीच शाळेत येणारे विद्यार्थी सदर खोलीकडे जाण्याच्या मार्गात बांधी असल्याचे दिसले ही विद्यार्थ्यांची खोडकरपणा असेल म्हणून त्यांनी ते तोडून आपल्यावर खोल्यात जाण्यास सुरुवात केली घटना घटना घडली त्या वर्गखोलीत सकाळी आलेले विद्यार्थिनी प्रवेश करण्यासाठी गेली असता वर्गखोली चा दार उघडत नव्हता म्हणून त्या विद्यार्थिनीने खिडकीतून आठ डोकावून पाहिले तर एक मुलगा सिलिंग फॅन ला दोरीने लटकवून आत्महत्या केल्याचे दिसले त्या विद्यार्थ्यांना आपल्या मैत्रिणीसोबत शाळेतील शिक्षकांना माहिती दिली.


सदर विद्यार्थ्यांनी तोंडाला रुमाल बांधली असल्यामुळे सदर इसम कोण आहे याची माहिती तात्काळ कळू शकली नाही.लगेच शाळेतील शिक्षकांनी गावातील पोलीस पाटील व ब्रह्मपुरी पोलिस स्टेशनला सदर घटनेची माहिती दिली पोलीस आल्यानंतर वर्गखोली प्रवेश करून पंचनामा करण्यास सुरुवात केली त्याच वेळेस शाळेतील वर्ग बारावी कला मध्ये शिकणारा लिखित रवींद्र बोराडे हा आत्महत्या करणारा विद्यार्थी असल्याचे निदर्शनास आले. 


मृताला ब्रह्मपुरी येथील ग्रामीण रुग्णालयात पीएम करण्यासाठी आणण्यात आले सदर तपास ब्रह्मपुरी पोलिस स्टेशनचे पोलीस निरीक्षक प्रमोद मकेश्वर करीत आहेत.

Y