चंद्रपूर महानगरपालिकेतील सफाई कामगारांच्या पदोन्नतीच्या प्रकरणांबाबत निवड समितीची मंजुरी घेऊन आदेश पारित करणार #sudhirmungantiwar - Khabarkatta ✒ खबरकट्टा

           Khabarkatta ✒ खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'

चंद्रपूर महानगरपालिकेतील सफाई कामगारांच्या पदोन्नतीच्या प्रकरणांबाबत निवड समितीची मंजुरी घेऊन आदेश पारित करणार #sudhirmungantiwar

Share This
- आ.सुधीर मुनगंटीवार यांच्या तारांकीत प्रश्नाला नगरविकास मंत्र्यांचे उत्तर
 खबरकट्टा / चंद्रपूर -


चंद्रपूर महानगरपालिकेच्या मंजूर आकृतीबंधानुसार सफाई कामगारांची ४६२ पदे मंजूर असून प्रत्यक्षात ४७६ कर्मचारी कार्यरत आहेत. यातील १० सफाई कामगारांना त्यांच्या शैक्षणिक पात्रतेनुसार प्रत्यक्ष पदोन्नती दिलेली असून २८ सफाई कामगारांना त्यांच्या शैक्षणिक पात्रतेनुसार टेबलवर्क व इतर कामे सोपविण्यात आली आहेत. सफाई कामगारांची २२ प्रकरणे शासन नियमाप्रमाणे अपात्र असून त्यांना वारसा हक्काचा लाभ अनुज्ञेय होत नाही, अशी माहिती नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी विधानसभा तारांकीत प्रश्नाच्या उत्तरात दिली आहे.


दि.२५.२.२०२० रोजी आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी विचारलेल्या तारांकीत प्रश्नाच्या उत्तरात नगर विकास मंत्र्यांनी वरील माहिती दिली. चंद्रपूर महानगरपालिकेतील कार्यरत सफाई कामगारांच्या मागण्यांच्या पुर्ततेबाबत मूळ प्रश्न आमदार मुनगंटीवार यांनी विचारला होता. सफाई कामगारांची पदोन्नती प्रकरणे निकाली काढताना कर्मचारी निवड समितीची मंजुरी घेऊन आदेश पारित करण्यात येत असल्याची माहिती या प्रश्नाच्या उत्तरात नगर विकास मंत्र्यांनी दिली.


स्वातंत्र्य संग्राम सैनिकांच्या अवलंबितांच्या मागण्यांबाबतचा प्रस्ताव शासनाच्या विचाराधीन असल्याची माहिती मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी तारांकीत प्रश्नाच्या उत्तरात दिली. स्वातंत्र्य संग्राम सैनिकांच्या अवलंबितांच्या मागण्यांची पूर्तता करण्याबाबत मूळ तारांकीत प्रश्न आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी विचारला होता. याबाबत शासन स्तरावर कार्यवाही सुरू असल्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी प्रश्नाच्या उत्तरात दिली आहे.