चंद्रपूर येथे २२ मार्चला राज्यस्तरीय पर्यावरण सम्मेलनाचे आयोजन #State Level Environmental Conference Organizing at Chandrapur - Khabarkatta ✒ खबरकट्टा

           Khabarkatta ✒ खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'

चंद्रपूर येथे २२ मार्चला राज्यस्तरीय पर्यावरण सम्मेलनाचे आयोजन #State Level Environmental Conference Organizing at Chandrapur

Share This
खबरकट्टा / चंद्रपूर : 


पर्यावरण संवर्धन व विकास समिती चंद्रपूर आणि महाराष्ट्र प्रदुषण नियंत्रण मंडळ, चंद्रपूर यांच्या संयुक्त विद्यमाने २२ मार्च २०२० ला जागतीक वनदिन व जागतीक जलदिनाचे औचित्य साधुन स्नेहबंध सभागृह ऊर्जानगर चंद्रपूर येथे राज्यस्तरीय पर्यावरण सम्मेलनाचे आयोजन करण्यात येणार आहे. 

सदर सम्मेलनाकरिता महाराष्ट्र राज्याचे ओबीसी, खार जमिन, मदत व पूनर्वसन मंत्री आणि चंद्रपूर जिल्हयाचे पालकमंत्री ना. विजय वडेट्टीवार , ऊर्जा व आदिवासी विकास राज्यमंत्री ना. प्राजक्त तनपूरे, पर्यावरण राज्यमंत्री ना. संजय बन्सोडे, खासदार बाळु धानोरकर, आमदार सुभाष धोटे, आमदार किशोर जोरगेवार, राजु कारेमोरे आमदार तुमसर, मनोहर चंद्रीकापुरे, आमदार अर्जुनी (मोरगांव), जिल्हाधिकारी कुणाल खेमनार, महाराष्ट्र प्रदुषण नियंत्रण मंडळाचे प्रादेशिक अधिकारी मधुकर लाड यांना निमंत्रित करण्याचे ठरले आहे. 

सदर पर्यावरण सम्मेलनामध्ये पर्यावरणाक्षेत्रात उल्लेखनिय काम करणा-या पर्यावरणा प्रेमींना पर्यावरण रत्न व पर्यावरण मित्र पुरस्कारानी पाहुण्यांच्या हस्ते सन्मानीत करण्यात येणार आहे. तर विविध क्षेत्रात उल्लेखनिय काम करणा-या व्यक्तींचा समाज भुषण पुरस्कार देवून गौरव करण्यात येणार आहे. 

तसेच पर्यावरण सम्मेलना निमीत्य निबंध स्पर्धा, पोस्टर स्पर्धा आणि पर्यावरण विषयावर विशेष पुरवणी सुध्दा प्रकाशित करण्यात येणार आहे. 

तरी २२ मार्च २०२० ला होणा-या राज्यस्तरीय पर्यावरण सम्मेलनाकरिता पर्यावरण प्रेमी व सामाजीक क्षेत्रात काम करणा-या व्यक्तींनी मोठया संख्येनी उपस्थित राहण्याचे आवाहन पर्यावरण समितीचे अध्यक्ष डी.के. आरीकर, उपाध्यक्ष राजेश सोलापन, सचिव हरिष ससनकर, शुभांगी डोंगरवार, राणी राव, एच.बी. पटले, डॉ. देव कन्नाके, सुनिल दहेगांवकर, प्रियदर्शन इंगळे, राणी येलेकर, लता चापले, पुजा शेरकी, नंदा शेरकी, कौशर खान यांनी एका पत्रका द्वारे केले आहे.