स्मार्ट ग्राम बिबी येथे शिवजन्मोत्सव सोहळा संपन्न #sivajimaharaj - Khabarkatta ✒ खबरकट्टा

           Khabarkatta ✒ खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'

स्मार्ट ग्राम बिबी येथे शिवजन्मोत्सव सोहळा संपन्न #sivajimaharaj

Share This
खबरकट्टा / चंद्रपूर : कोरपना -

इतिहासाच्या पानावर रयतेच्या मनावर मातीच्या कणावर आणि विश्वासाच्या प्रमाणावर राज्य करून शिवनेरीच्या क्षितिजावर उगवलेला शेकडो वर्षाची काळरात्र चिरून स्वराज्याच्या मंगल प्रकाशाने सगळा आसमंत तेजोमय करून रयतेला मातीसाठी लढायला आणि मरायला तयार करणारे हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांचा शिवजन्मोत्सव सोहळा नुकताच स्मार्ट ग्राम बिबी येथे संपन्न झाला.
          
सदर सोहळ्याची सुरवात शिवरथ शोभयात्रेने करण्यात आली व त्यानंतर प्रबोधन व सांस्कृतिक कार्यक्रम घेण्यात आला होता. या जयंती उत्सव सोहळ्याला प्रबोधक म्हणून मान.श्री हरिश्चंद्रजी थिपे सर (माजी अध्यक्ष मराठा सेवा संघ, कोरपणा) तर उद्घाटक म्हणून समाजसेवक डॉ. गिरीधरजी काळे होते. अध्यक्षस्थानी माजी आमदार तथा जेष्ठ विदर्भवादी नेते अॅड. वामनरावजी चटप साहेब होते. विचारपिठावर प्रमुख अतिथी म्हणून प्रा. अशिषजी देरकर(उपसरपंच), श्री.राहुलजी आसुटकर(पोलीस पाटील), तंटामुक्त समितीचे अध्यक्ष श्री. शंकर पा. आस्वले, सौ. सविताताई काळे(पं.स.सदस्य कोरपणा), श्री.श्रावण पा. चौके, श्री.पुंडलिक पा.मोरे, श्री.निवृत्तीजी ढवस, ग्राम पंचायत सदस्य श्री.सचिनजी सिडाम, सौ.सुधाताई मोरे आदी मान्यवर उपस्थित होते. 

        
कार्यक्रमाचे प्रबोधक श्री.हरिश्चंद्रजी थिपे यांनी शिवचरित्रावर प्रकाश टाकतांना इतिहासात शिवकाळ हा एकमेव असा काळ आहे कि, स्वराज्यासाठी रयत लढायला आणि मरायला तयार होती आणि त्यातूनच स्वराज्याची ज्योत प्रज्वलीत झाली, खरं तर स्वराज्य हे तलवारीच्या पातीवर नाही तर कौतुकाच्या थापेवर उभं राहिलं म्हणूनच तरुणांनी शिवाजी महाराजांचे आदर्श विचार सुसंस्कारीत समाजनिर्मितीसाठी आत्मसात करावे. 
         
अध्यक्षीय भाषणात अॅड.चटप साहेब यांनी शिवकाळातील शेतकरी व आजचा शेतकरी यांवर भाष्य करतांना, शिवकाळातील महाराजांचे शेतकऱ्यांविषयीचे धोरणे हे शेतकऱ्यांच्या कल्याणकारी हिताचे असून आजच्या सरकारने देखील महाराजांचा राज्यकारभाराचा आरसा डोळ्यांसमोर ठेवून शेतकऱ्यांच्या हिताचे धोरणे आखावीत असा आशावाद व्यक्त केला.
       
कार्यक्रमाचे संचालन सुरज लेडांगे यांनी केले.प्रास्ताविक सचिन खनके तर आभार श्रुती शेंडे हिने मानले. कार्यक्रमाच्या यशस्वितेकरिता छत्रपती शिवाजी महाराज जयंती उत्सव समितीने मोलाचे परिश्रम घेतले. सोहळ्याचे साक्षीदार म्हणून गावकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.