अवकाळी पावसामुळे कोसा उत्पादकांचे नुकसान सुमारे दीड लाखांचे अंडीपूंज नष्ट #silkworm - Khabarkatta ✒ खबरकट्टा

           Khabarkatta ✒ खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'

अवकाळी पावसामुळे कोसा उत्पादकांचे नुकसान सुमारे दीड लाखांचे अंडीपूंज नष्ट #silkworm

Share This
खबरकट्टा /चंद्रपूर: 

सावली, ब्रह्मपुरी तालुक्यात मोठ्या प्रमाणावर कोसा उत्पादक होत असून, यंदा झालेल्या अवकाळी पावसामुळे मोठ्या प्रमाणात कोसा उत्पादकांना फटका बसला आहे. एकूण ११५ शेतकर्‍यांचे ५४ हजार ५५० अंडीपुंज नष्ट झाले असून, नुकसानीचा आकडा एक लाख ६३ हजार ६५० रुपये इतका आहे. ही भरपाई शासनाने तातडीने मंजूर करावी, अशी मागणी श्रमिक एल्गारच्या संस्थापक अ‍ॅडव्होकेट पारोमिता गोस्वामी यांनी जिल्हाधिकारी यांना दिलेल्या निवेदनातून केली आहे.

सावली तालुक्यातील पाथरी येथे जिल्हा रेशीम कार्यालय आहे. या कार्यालयांतर्गत जिल्ह्यातील अनेक गावात उत्पादन मोठ्या प्रमाणावर केले जात आहे. मागील वर्षाच्या हंगामात मोठ्या प्रमाणावर कोसा उत्पादक शेतकरीवर्गाने कोसा लागवड केली होती. मात्र निसर्गाच्या लहरीपणामुळे कोसा उत्पादक शेतकर्‍यांना फार मोठा फटका बसलेला आहे. यात उत्पादक शेतकर्‍यांचे प्रचंड नुकसान झाले असून आर्थिक स्थिती नाजूक असल्याने दैनंदिन जीवन जगणे कठीण होत आहे. सदर शेतकरी दरवर्षी शासनाने ठरवून दिलेल्या दराप्रमाणे जिल्हा रेशीम कार्यालयातून विकत घेतात. 

त्यामुळे सदर नुकसानीतून उत्पादक शेतकर्‍यांना दिलासा देण्याकरिता शासनाने नुकसानभरपाई जाहीर करावी, अशी मागणी श्रमिक एल्गारच्या वतीने जिल्हाधिकार्‍यांना दिलेल्या निवेदनातून करण्यात आली. नुकसानग्रस्त उत्पादक शेतकरी पाथरी, अंतरगाव, आकापूर, मेहा, जाम बुद्रुक, आवळगाव, हळदा, आक्सापुर, तिसगाव, कोसंबी, मुरपार, गोविंदपूर, गोगाव येथील रहिवासी आहेत. यावेळी श्रमिक एल्गारचे कोषाध्यक्ष अनिल मडावी यांच्यासह कोसा उत्पादक शेतकर्‍यांची उपस्थिती होती.

२६ महिला कामगारांचा प्रश्न :
टसर निर्मिती केंद्र पाथरी येथे हे मागील तीस वर्षापासून २६ महिला कामगार मडक्यावर सूत काढण्याचे व मशीनद्वारे रेशीम सूत काढण्याचे काम करीत आहेत. हे काम कुशल स्वरूपाचे असून कामाची मजुरी अंग मेहनतीवर अवलंबून असते. सध्याचे शासकीय दर कमी असल्याने महिला कामगारांना अतिशय कमी मजुरीत काम करावे लागत आहे. मडक्यावर सूत काढण्यासाठी एक किलो सूत निर्मितीकरिता एक हजार रुपये दर करण्यात यावा, मशिनद्वारे सूतकताई साठी शंभर कोसासाठी शंभर रुपये करावे, महिला कामगारांना ड्रेस कोड नुसार वर्षाकाठी दोन साड्या विनामूल्य देण्यात याव्यात, स्वातंत्र्य दिन, गणराज्य दिन आणि कामगार दिन या दिवशी पगारी रजा देण्यात यावी, आदी मागण्या चंद्रपूरचे जिल्हाधिकारी यांच्याकडे दिलेल्या निवेदनातून करण्यात आली.