ऊर्जानगरात शिवजयंती उत्साहात साजरी : बघा विडिओ - भव्य शोभायात्राचे आयोजन : ढोल ताशाच्या गजरात लखलखली रोषणाई : विविध स्पर्धा व शिवरायांच्या जीवनावर व्याख्यान संपन्न #shivajimaharaj - Khabarkatta ✒ खबरकट्टा

           Khabarkatta ✒ खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'

ऊर्जानगरात शिवजयंती उत्साहात साजरी : बघा विडिओ - भव्य शोभायात्राचे आयोजन : ढोल ताशाच्या गजरात लखलखली रोषणाई : विविध स्पर्धा व शिवरायांच्या जीवनावर व्याख्यान संपन्न #shivajimaharaj

Share This
खबरकट्टा / चंद्रपूर : ऊर्जानगर वसाहत -

                                            
रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज यांची ३९० वी जयंती निमित्त राजे शिव छत्रपती जन्मोत्सव मंडळ ऊर्जानगर द्वारा विविध कार्यक्रमांचे आयोजन कामगार मनोरंजन केंद्रा समोरील पटांगणावर करण्यात आले होते. दि.१६ फेब्रुवारी ला विविध स्पर्धा यात रांगोळी स्पर्धा,चित्रकला, हॅन्डरायटिंग,वक्तृत्व स्पर्धा घेण्यात आल्या.दि.१७ फेब्रुवारी ला भव्य रक्तदान शिबिर,दि.१८ फेब्रुवारीला सायं ८ वाजता व्याख्याते प्रा रामचंद्र पाटील जळगांव यांचा प्रत्येकात शिवराय या विषयावर व्याख्यानाचा कार्यक्रम घेण्यात आला तसेच दि.१९ फेब्रुवारी ला सकाळी ८ वाजता चंद्रपूर विज केंद्राचे मुख्य अभियंता राजू घुगे यांचे हस्ते ध्वजारोहण व विविध स्पर्धेचे बक्षीस वितरण तसेच सायं ऊर्जानगर वसाहतीतून कामगार मनोरंजन केंद्रापासून ते सौंदामीनीचौक मार्गे सुपर एफ चौक,स्नेहबंध चौक,योगभवन द्वारा कार्यक्रम स्थळ अशी भव्य दिव्य शोभायात्राचे आयोजन करण्यात आले. 

या शोभायात्रेत ऊर्जानगर वासीय व परिसरातील नागरिकांचा आणि मंडळाचे पदाधिकारी ,सदस्यांची उपस्थिती होती.