शेतकरी महोत्सव २०२० : आयोजन समितीचे उद्धेश -अधिकाधिक शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवा आणि द्या आपल्या पोशिंद्याला एक मदतीचा हाथ #shetkarimahotsav - Khabarkatta ✒ खबरकट्टा

           Khabarkatta ✒ खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'

शेतकरी महोत्सव २०२० : आयोजन समितीचे उद्धेश -अधिकाधिक शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवा आणि द्या आपल्या पोशिंद्याला एक मदतीचा हाथ #shetkarimahotsav

Share This
खबरकट्टा / चंद्रपूर :शेती-व्यवसाय बदलत्या परिस्थितीत शेतकऱ्यांना उत्पादन वाढीसाठी प्रोत्साहन देण्यास अनन्यसाधारण महत्त्व आहे. प्रयोगशील व प्रगतीशील शेतकऱ्यांचे माध्यमातून शेतकऱ्यांना आपाआपसातील विचारांची देवाणघेवाण करण्यास व्यासपीठ उपलब्ध करुन दिल्यास त्यांच्यातील आत्मविश्वास वृध्दिंगत होऊ शकतो. आधुनिक कृषी तंत्रज्ञानाचा शाश्वत पद्धतीने अवलंब केल्यास शेतकरी आर्थिकदृष्ट्या उन्नत होऊन जागतिक पातळीवरील स्पर्धाक्षम वातावरणात आपले स्थान सिध्द करु शकतील. याकरिता चंद्रपूर जिल्ह्यात 8 व 9 फेब्रुवारी ला चांदा क्लब ग्राउंड चंद्रपूर येथे कृषी महोत्सवाचे आयोजन करण्यात येणार आहे. च्या शासन निर्णयानुसार मान्यता देण्यात आली आहे. या कृषी महोत्सवा विषयीची माहिती सांगणारा लेख व घेण्यामागील आयोजन समितीचे उद्धेश

 1. सरकारी योजनांची माहिती शेतकरी व गावातील तरूणांपर्यंत पोहचवणे व समाजात योजनांचा लाभ घेण्याची मानसीकता तयार करणे.
 2. महिला बचतगटांना प्रोत्साहन देणे 
 3. समाजातील व्यावसायीकांना समाजासमोर ठेवणे.
 4. ग्रामीण भागातील समाज शहरी समाजा सोबत जोडणे.
 5. नाविण्यपुर्ण प्रकल्पाची माहिती देणे.
 6. ग्रामीण भागातील समाज बांधवांना संस्थेचे सदस्य बनवणे.
 7. शेतकर्यांची डिरेक्टरी तयार करयुवकांना आर्थीक दृष्ट्या सक्षम करण्यासाठी मार्गदर्शन करणे.
 8. समाजात आपसी सहकार्याची भावना वाढवी म्हणून प्रयत्न करणे.

त्याचसोबत कृषी विषयक विकसित तंत्रज्ञान व शासकीय योजनांची माहिती शेतकऱ्यांपर्यंत पोहोचविणे, शेतकरी, शास्त्रज्ञ आणि संशोधन विस्तार, शेतकरी विपणन साखळी सक्षमीकरण, समूह, गट संघटित करुन स्थापित शेतकरी उत्पादक कंपन्यांची क्षमता बांधणी करणे, शेतकऱ्यांच्या उत्पादनास योग्य भाव मिळावा, ग्राहकांना उच्च दर्जाचा माल मिळावा याकरिता शेतकरी ते ग्राहक थेट विक्री श्रृंखला विकसित करणे, कृषी विषयक परिसंवाद, व्याख्याने यांच्या माध्यमातून विचारांच्या देवाणघेवाणींद्वारे शेतकऱ्यांच्या समस्यांचे निराकरण करणे, विक्रेता – खरेदीदार संमेलनाच्या माध्यमातून बाजाराभिमुख कृषी उत्पादनास आणि विपणनास चालना देण्याचा प्रयत्न राहील असे मुख्य आयोजक श्री. विनायक धोटे यांनी टीम खबरकट्टा ला कळविले आहे.

विविध सार्वजनिक खासगी भागीदारीतून चालू प्रकल्प, कृषी माल प्रक्रिया उद्योजक आणि शेतकरी उत्पादक कंपन्या यांच्या एकत्रित सुसंवादाकरिता सर्व घटक एका व्यासपीठावर आणून बाजाराभिमुख कृषी विस्ताराला चालना देणे याकरिता परिसरातील शेतकऱ्यांना आपल्या उत्पादन मालाचे प्रदर्शन व विक्री करिता स्टॉल उपलब्ध करून देण्यात येणार असून बुकिंग करिता 9075419913 या क्रमांकावर संपर्क साधावा.