मार्चमध्ये शेतकऱ्यांचा सातबारा कोरा होणार : मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी केली घोषणा #shetkarikarjmafi - Khabarkatta ✒ खबरकट्टा

           Khabarkatta ✒ खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'

मार्चमध्ये शेतकऱ्यांचा सातबारा कोरा होणार : मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी केली घोषणा #shetkarikarjmafi

Share This
मार्चमध्ये शेतकऱ्यांची कर्जमुक्ती अन् नवी योजना, उद्धव ठाकरेंची घोषणा : 'सामना'ला दिलेल्या विशेष मुलाखतीत आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मोठी घोषणा केली आहे. मार्चमध्ये 2 लाखांपर्यंत कर्ज असणाऱ्या शेतकऱ्यांची कर्जमुक्ती होणार, असे उद्धव यांनी सांगितले. तसेच 2 लाखांच्या वर कर्ज असणाऱ्या आणि नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी लवकरच नवी योजना आणली जाईल, असेही ठाकरे यांनी सांगितले.

खबरकट्टा / महाराष्ट्र :मार्चमध्ये शेतकऱ्यांचा सातबारा कोरा होणार : मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी केली घोषणा

शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करण्याचा शब्द मी शेतकऱ्यांना दिला असून दिलेल्या शब्दाप्रमाणे येत्या मार्च महिन्यापासून ही योजना सुरू करण्यात येईल, अशी माहिती मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिली आहे. दोन लाखांपर्यंत ज्यांचं पीक कर्ज आहे, ते पूणपणे माफ होणार असून त्याच्या सातबारावरून ही पीककर्ज काढून टाकलं जाणार आहे, असंही मुख्यमंत्री ठाकरे यांनी स्पष्ट केलं आहे. दोन लाखांपेक्षा वर असलेल्या कर्जदारांसाठी आणि विशेषत: जे नियमित कर्ज फेडत आहेत अशांसाठी लवकरच योजना जाहीर करून ती अंमलात आणली जाईल अशी घोषणाही उद्धव ठाकरे यांनी केली आहे.'सामना' या शिवसेनेच्या मुखपत्राचे कार्यकारी संपादक, खासदार संजय राऊत यांनी घेतलेल्या दीर्घ मुलाखतीच्या दुसऱ्या भागात मुख्यमंत्री ठाकरे बोलत होते.

मुख्यमंत्री पुढे म्हणाले की, या योजना कार्यान्वित करत असताना राज्याच्या आर्थिक परिस्थितीचा आढावा घेऊनच या योजना तयार करण्यात येणार आहेत. मला करायची असेल तर आताही ती घोषणा मी करू शकतो. असं नाही की योजना तयार नाहीये. योजना तयार केल्यानंतर ती अमलात आणण्याची तयारी झाल्यानंतर ती अमलात आणावी लागते.र्जमाफी हा प्रथमोपचार असल्याचे या वेळी मुख्यमंत्री म्हणाले. शेतकरी त्याच्या पायावर कसा उभा राहील यासाठी आपला प्रयत्न असला पाहिजे. त्यासाठी शेतीसाठी नवे प्रयोग कसे करता येतील, कमी जागेत जास्त पीक कसं घेता येईल, ते पीक आल्यानंतर त्याला योग्य दाम किंवा योग्य भाव कसा मिळवून दिला जाईल, त्याचं मार्केटिंग कसं केलं जाईल अशी संपूर्ण चेन असायला हवी. याची अखणी करण्याची आवश्यकता असून त्याबद्दल सुद्धा निर्णय घेतले असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले.