लॉर्ड बेडेन पॉवेल यांच्या जयंती नीमीत्य " चिंतन दिन " संपन्न. - स्कॉऊट-गाईड व कब -बुलबुल च्या विध्यार्थीना मोफत शैक्षणिक साहित्य वाटप #scoutguide - Khabarkatta ✒ खबरकट्टा

           Khabarkatta ✒ खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'

लॉर्ड बेडेन पॉवेल यांच्या जयंती नीमीत्य " चिंतन दिन " संपन्न. - स्कॉऊट-गाईड व कब -बुलबुल च्या विध्यार्थीना मोफत शैक्षणिक साहित्य वाटप #scoutguide

Share This
खबरकट्टा / चंद्रपूर :बालवीद्या शिक्षण प्रसारक मंडळ द्वारा संचालित आदर्श मराठी प्राथमिक विद्यामंदिर ,राजुरा येथे स्कॉऊट-गाईड चळवळीचे जनक लॉर्ड बेडेन पॉवेल ऑफ गीलबेल यांच्या जयंती नीमीत्य " चिंतन दिन " साजरा करण्यात आला. यावेळी आयोजित कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आदर्श हायस्कूल चे मुख्याध्यापक सारीपुत्र जांभूळकर , आदर्श प्राथमिक च्या मुख्याध्यापिका नलीनी पिंगे ,राष्ट्रीय हरित सेना विभाग प्रमुख बादल बेले, छ. शिवाजी महाराज स्कॉऊट यूनिट मास्टर रुपेश चिडे ,बुलबुल यूनिट च्या शिक्षिका अर्चना मारोटकर ,सहायक शिक्षक नवनाथ बुटले आदिंचि प्रामुख्याने उपस्थिती होती.

सर्वप्रथम विध्यार्थीनी स्कॉऊट-गाईड ची प्राथणा व प्रतीद्या वाचन केली. त्यानंतर 8 जानेवारी 1941 ला बेडेन पॉवेल यांच्या निधनानंतर त्यांच्या कागदपत्रातील आढळलेले बी.पी.चा शेवटचा संदेश याचे वाचन व त्या संदेशाच्या प्रति विद्यार्थीना वाटप करण्यात आल्या. तसेच लॉर्ड बेडेन पॉवेल यांच्या जयंती नीमीत्य स्कॉऊट-गाईड ,कब -बुलबुल च्या विद्यार्थीना मोफत शैक्षणीक साहित्य वाटप करण्यात आले. यावेळी प्रमुख अतिथि बादल बेले यांनी विध्यार्थीना स्कॉऊट-गाईड चळवळीविषयी माहिती तसेच लॉर्ड बेडेन पॉवेल यांच्या जीवनचरीत्रा विषयी मार्गदर्शन केले. 

कार्यक्रमाचे अध्यक्ष सारीपुत्र जांभूळकर यांनी आपल्या मनोगतातून विध्यार्थी हा देशाचा आधारस्तंभ असून जीवनात राष्ट्रनिर्मितीकरीता त्यांनी अविरतपणे प्रयत्नरत राहावे असे प्रतिपादन केले. चिंतन दीना नीमीत्य आपण संस्कारसंपन्न होन्याकरीता व ही चळवळ पुढे नेन्याकरीता करावयाच्या प्रयत्नांवर रुपेश चिड़े यांनी मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे सूत्र संचालन युवराज राठोड व  दिव्या राठोड यांनी केले. प्रास्तावीक गूंजन गौरकार यांनी तर आभार वैष्णवी कोरडे हिने मानले.कार्यक्रमाच्या यशस्वीतेकरीता छत्रपती शिवाजी महाराज स्कॉऊट यूनिट व जिजामाता गाईड यूनिटच्या विध्यार्थीनी अथक परिश्रम घेतले.