विध्यार्थीच्या सकारात्मक ऊर्जेने स्कॉऊट -गाईड चळवळीची प्रगती. - पुनम म्हस्के - तीन दिवशिय स्कॉऊट-गाईड जिल्हा मेळाव्याचा थाटात समारोप : जिल्ह्यातील सहाशेच्या वर विध्यार्थीचा सहभाग #scoutguide - Khabarkatta ✒ खबरकट्टा

           Khabarkatta ✒ खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'

विध्यार्थीच्या सकारात्मक ऊर्जेने स्कॉऊट -गाईड चळवळीची प्रगती. - पुनम म्हस्के - तीन दिवशिय स्कॉऊट-गाईड जिल्हा मेळाव्याचा थाटात समारोप : जिल्ह्यातील सहाशेच्या वर विध्यार्थीचा सहभाग #scoutguide

Share This
खबरकट्टा / चंद्रपूर :


विद्यार्थ्यांच्या सुप्त गुणांना वाव देत निसर्गाच्या सानिध्यात राहून स्वयंशिस्त, स्वतःची कामे स्वतः करने ,योगा, सर्वधर्मसमभाव प्राथणा, शारीरिक,बौद्धिक ऊर्जा देणारे साहसी खेळ ,तंबूत राहणे, ग्यझेटच्या माध्यमातून आपल्या घरातील साहीत्याप्रमाने बांबूच्या काळ्यापासून साहित्य तयार करने ,पथसंचलन ,शोभायात्रा या सर्व बाबींमुळे विध्यार्थीनी सकारात्मक उर्जेने स्कॉऊट- गाईड चळवळीची प्रगती साधली असे प्रतिपादन उपशिक्षणाधीकारी (माध्य.) जिल्हा परिषद चंद्रपुर तथा मेळावा संचालिका पुनम म्हस्के यांनी विशेष अतिथि म्हणून स्कॉऊट गाईड च्या जिल्हा मेळाव्याच्या समारोपीय कार्यक्रमाप्रसंगी केले.

चंद्रपुर भारत स्कॉऊटस  आणि गाईडस जिल्हा संस्था चंद्रपुर द्वारा आयोजित स्कॉऊट गाईड जिल्हा मेळावा राजुरा येथील आदर्श मराठी प्राथमिक विद्यामंदिर येथे दिनांक 6 ते 8 फेब्रुवारी ला आयोजित करण्यात आला होता. समारोपीय कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून डॉ. सुरेश महाकुलकर ,अध्यक्ष ,स्कॉऊट गाईड,चंद्रपुर हे होते. तर प्रमुख अतिथि म्हणून विजय टोन्गे, जिल्हा चिटणीस ,सतीश धोटे,अध्यक्ष,बा.शी.प्र.मं.,भास्कर येसेकर,सचिव, मधुकर जानवे,संचालक, पी.एस.जाधव,कोशाध्यक्ष,स्कॉऊट गाईड ,प्राचार्य शांताराम ऊइके ,कार्यक्रम प्रमुख ,यशवंत हजारे ,जिल्हा संघटक ,स्कॉऊट गाईड ,नलीनी पिंगे,मुख्याध्यापिका आदर्श प्राथमिक शाळा, सारीपुत्र जांभूळकर ,मुख्याध्यापक ,आदर्श हायस्कूल आदींची प्रामुख्याने उपस्थिति होती. 

या शिबिराला राजुरा विधानसभा क्षेत्राचे आमदार सुभाष धोटे यांनी भेट देऊन शिबिरातिल सहभागी विध्यार्थी व शिक्षकांशी संवाद साधला आणि त्यांचे अभिनंदन व कौतुकही केले. संपूर्ण चंद्रपुर जिल्ह्यातील सहाशेच्या वर स्कॉऊट गाईड विध्यार्थीचा या शिबिरात सहभाग होता. तीन दिवशीय शिबिरात पोलीस विभागातील श्वान पथकाचे प्रात्यक्षिक, शेकोटी सांस्कृतिक कार्यक्रम ,सन्मानसभा ,डान्सिन्ग योगा,शारीरिक कवायत , मनोरे ,व साहसी खेळ स्पर्धा, पोलीस वीभातील शस्त्रांची माहिती,प्रथमोपचार व पथसंचलन ,शोभायात्रा स्पर्धा ,सर्वधर्म प्राथणा अश्या विविध कार्यक्रमांचे दैनिक वेळापत्रकानुसार आयोजन करण्यात आले. 

स्पर्धेतील विजेत्यांना सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र भेट देण्यात आले.यावेळी स्मिता ठाकरे व अ्ल्का ठाकरे तसेच राष्ट्रपति पुरस्कारप्राप्त विध्यार्थीचा सत्कार करण्यात आला.  कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मेळावा प्रमूख किशोर ऊइके व शांताराम ऊइके यांनी केले. तर आभार प्रदर्शन उप मेळावा प्रमुख बादल बेले यांनी केले.प्रास्तावीक विजय टोन्गे,जिल्हा चिटणीस स्कॉऊट गाईड यांनी केले.

या मेळाव्याच्या यशस्वीतेकरीता सुरेखा बोमणवार, किशोर कानकाटे ,अणु खानझोडे ,छाया मोहीतकर ,कैलास भसाखेत्रे ,प्राचार्य स्मिता ठाकरे ,निता आगलावे ,संध्या गोहाकार ,प्रशांत खूसपूरे ,प्रमोद बाभळीकर ,प्रकाश डाखोले ,अर्पित कडू ,वसंत विहीरघरे ,राजू बल्कि ,अरुणा ठाकरे ,अ्ल्का ठाकरे ,रुपेश चिड़े ,सुनीता कोरडे ,अर्चना मारोटकर ,रोशनी कांबले आदींसह जिल्हा मंडळाचे पदाधीकारी व सद्श्यगण, जिल्ह्यातील विविध शाळांचे मुख्याध्यापक,शिक्षक आणि रोअर,रेंजर ,माजी विध्यार्थी यांनी अथक परिश्रम घेतले. या शिबिराला अनेक प्रशाशकिय अधिकारी,सामाजिक ,राजकीय क्षेत्रातील विविध मांन्यवरांनि भेटी दिल्या.