फडणवीस सरकारच्या काळात झालेल्या वृक्ष लागवडीच्या चौकशीचे वनमंत्री संजय राठोड यांनी काढले आदेश : शिवसेना चंद्रपूर -बल्लारपूर विधानसभा संपर्क प्रमुख ऋतुकांचन रसाळ यांच्या मुख्यमंत्री कार्यालयातील तक्रारीची दखल तर वृक्ष लागवडीची श्वेतपत्रिकाच काढा : सुधीर मुनगंटीवार #sanjay rathod #sudhir mungantiwar - Khabarkatta ✒ खबरकट्टा

           Khabarkatta ✒ खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'

फडणवीस सरकारच्या काळात झालेल्या वृक्ष लागवडीच्या चौकशीचे वनमंत्री संजय राठोड यांनी काढले आदेश : शिवसेना चंद्रपूर -बल्लारपूर विधानसभा संपर्क प्रमुख ऋतुकांचन रसाळ यांच्या मुख्यमंत्री कार्यालयातील तक्रारीची दखल तर वृक्ष लागवडीची श्वेतपत्रिकाच काढा : सुधीर मुनगंटीवार #sanjay rathod #sudhir mungantiwar

Share This
खबरकट्टा /महाराष्ट्र : 


महाराष्ट्र विकास आघाडी सरकार देवेंद्र फडणवीस आणि त्यांच्या काळातील वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांना एक धक्का देण्याच्या तयारीत असल्याचं पाहायला मिळत आहे. कारण फडणवीस सरकारच्या काळातील 50 कोटी वृक्ष लागवडीची चौकशी होणार आहे. ठाकरे सरकारमधील काही मंत्र्यांनी व शिवसेना चंद्रपूर -बल्लारपूर विधानसभा संपर्क प्रमुख ऋतुकांचन रसाळ यांच्या मुख्यमंत्री कार्यालयात या संबंधात तक्रार दाखल करून सविस्तर चौकशीची मागणी करत अनेक संशयास्पद बाबींवर बोट ठेवत लक्ष वेधल्याने व शंका उपस्थित केल्याने वनमंत्री संजय राठोड यांनी चौकशीचे आदेश दिले आहेत.

त्यानंतर विद्यमान वनमंत्री संजय राठोड यांनी वन विभागाच्या प्रधान सचिवांना पाच वर्षांच्या काळात झालेल्या वृक्ष लागवडीच्या चौकशीचे आदेश दिले आहेत. कोणी किती झाडं लावली, त्यापैकी किती झाडं जगली याची सॅटेलाईट इमेजच्या माध्यमातून चौकशी होणार आहे. फडणवीस सरकारने हे अभियान राबवलं त्यावेळी सुधीर मुनगंटीवार वनमंत्री होते. त्यामुळे एकप्रकारने सुधीर मुनगंटीवार यांच्या महाअभियानाच्या कामकाजावरच संशय व्यक्त करण्यात आला आहे.

वृक्ष लागवडीची श्वेतपत्रिकाच काढा : सुधीर मुनगंटीवार -वृक्ष लागवड झाली त्यावेळी सुधीर मुनगंटीवार वनमंत्री होते. वृक्षलागवडीची चौकशी करायला काही हरकत नाही, आता असं त्यांनी म्हटलं आहे. माजी न्यायाधीशांच्या नेतृत्त्वात चौकशी समितीच नेमा. तसंच राज्यातील शंकाखोरांच्या मनातील शंका दूर करण्यासाठी श्वेतपत्रिकाही काढा, अशा आशयाचं लेखी पत्र स्वत: देणार आहे, असं सुधीर मुनगंटीवार म्हणाले. 33 कोटी वृक्ष लागवड हे ईश्वरीय-पर्यावरण कार्य आहे. याच मोहीमेमुळे राज्यातील वनेतर क्षेत्रात जंगल वाढल्याची नोंद केंद्रीय वनसर्वेक्षण विभागाने केली, असंही मुनगंटीवार यांनी लक्षात आणून दिलं. तसंच ही वृक्ष लागवड वनविभागाने नव्हे तर 32 विभागांनी आणि स्थानिक स्वराज्य संस्थांनी मिळून केल्याचं त्यांनी स्पष्ट केलं.