अवैधरित्या वनातून वाळू वाहतूक करताना ट्रॅक्टर जप्त #sand - Khabarkatta ✒ खबरकट्टा

           Khabarkatta ✒ खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'

अवैधरित्या वनातून वाळू वाहतूक करताना ट्रॅक्टर जप्त #sand

Share This
खबरकट्टा / चंद्रपूर :जिल्ह्यात सध्या अवैध रेती उत्खनन व वाहतूक जोरात असून, तस्करांना कुठलेही भय उरलेले नाही. दोन दिवस पूर्वीच पोंभुर्णा तालुक्यात नायब तहसीलदारावर एका तस्कराने हमला चढविल्यानंतर खनिकर्म पासून वनविभाग पर्यंत सर्व अधिकारी तस्करांच्या मुसक्या आवळण्यास सज्ज झाल्याचे चित्र जिल्ह्यात दिसू लागले आहे. 

बल्लारपूर तालुक्यातील अवैद्य रीत्या सरकारी वन कक्ष क्रमांक 495 केम बामणी गावालगत वनरक्षक श्री. सुरवसे, टेकाम, कांबळे गस्त करीत असताना  रेती भरून वाहतूक करीत असताना आरोपी नामे संतोष मोहनसिंग चव्हाण रा. बामणी बेघर ट्रॅक्टर क्रमांक MH34 AP 1043ट्रॉली क,MH 33 2530 जप्ती करून प्रसुरी क्र,152/22 नोंद करून भारतीय वन अधिनियम 1927 चे कलम 26 अन्वये तसेच महा राष्ट्र वन नियमावली 2014 अन्वये वांगुन्हा नोंद करून जप्त वाहन वनपरिक्षेत्र कार्यालय बल्लारशा येथे ठेवून वनपरिक्षेत्र अधिकारी संतोष थिपे यांचे मार्गद्शनाखाली तपास सुरू आहे.