भरधाव धडकेत प्रेमीयुगुल गंभीर जखमी : अपघातामुळे फुटले प्रेमीयुगुलाचे बिंग..... !!!! #roadaccident - Khabarkatta ✒ खबरकट्टा

                     Khabarkatta  ✒ खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'

भरधाव धडकेत प्रेमीयुगुल गंभीर जखमी : अपघातामुळे फुटले प्रेमीयुगुलाचे बिंग..... !!!! #roadaccident

Share This
खबरकट्टा / चंद्रपूर -यवतमाळ 

भरधाव दुचाकी अपघातात प्रेमीयुगल गंभीर जखमी झाल्याची घटना काल रात्री 7:30 वाजताचे सुमारास उघडकीस आली आहे. 

सविस्तर वृत्तानुसार काल दि.27 फेब्रुवारीला सायंकाळी 7:30 वाजताचे दरम्यान वणीतील एक प्रेमीयुगल घुग्गुस मार्गे चंद्रपूरहुन वणीकडे आपल्या भरधाव दुचाकीने जात असता टोल नाक्याजवळ एका डिवायडरला त्यांची दुचाकी भिडली व त्या अपघातात ते दोघेही प्रेमीयुगल गंभीर जखमी झाले.

यावेळी सामाजिक कार्यकर्ता अजय नागपुरे त्या घटनास्थळावरुन जात असतांना अपघात झाल्याचे दिसतास त्यांनी मदत करुन गंभिर जखमी झालेल्या ,त्या दोघांनाही तात्काळ येथिल ग्रामीण रुग्णालयात दाखल केले.प्राथमीक उपचार केल्यानंतर त्यांना पुढिल उपचारा करिता जिल्हा रुग्णालयात हलविले असल्याची माहीती प्राप्त झाली आहे



आज अनेक ठिकाणी शहरात तसेच आजूबाजूच्या निसर्गमय, एकांत परिसरात प्रेमीयुगलांचा संचार चांगलाच वाढला असुन मिळेल त्या खाली जागेत प्रेमीयुगल रासलीला करत असल्याचे आढळुन येत आहे.यामध्ये महाविद्यालयीन मुले- मुली मोठ्याप्रमाणात आढळुन येत आहे.विशेष म्हणजे अल्पवयीन युवतींची संख्या जास्तप्रमाणात आहे.हि मोठी गंभीर बाब निदर्शनास येत असल्यामुळे भविष्यात मोठी घटना घडु नये याकरिता उपाय योजना करणे जरुरीचे झाले आहे.



दरम्यान या घटनेची माहिती त्या मुलीच्या माता पित्यांना मिळताच रुग्णालयात आले असता जखमी दोघेही प्रेमीयुगल असल्याचे बिंग फुटले.पालकांनी आपल्या मुलांकडे लक्ष देण्याची गरज निर्माण झाली आहे.