चंद्रपूर ब्रेकिंग : ट्रकच्या धडकेत वृद्ध महिलेचा मृत्यू : जबर धडकेत अक्षरश: चेंदामेंदा #roadaccident - Khabarkatta ✒ खबरकट्टा

           Khabarkatta ✒ खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'

चंद्रपूर ब्रेकिंग : ट्रकच्या धडकेत वृद्ध महिलेचा मृत्यू : जबर धडकेत अक्षरश: चेंदामेंदा #roadaccident

Share This
खबरकट्टा /चंद्रपूर : वरोरा - 


रस्ता ओलांडताना झालेल्या अपघातात एका वृद्ध महिलेचा मृत्यू झाला सदर घटना नागपूर चंद्रपूर महामार्गावर वरोऱ्यापासून जवळच असलेल्या ऐंसा (येनसा ) येथे घडली वृद्ध महिला ही तालुक्यातील बोरगाव (देश) येथील रहिवासी असून तिचे नाव भागाबाई राजाराम दरेकर (वय 70) असल्याचे कळते ही घटना दिनांक 15 फेब्रुवारीला सकाळी 11 वाजता घडली.
         
येनसा हे गाव नागपूर चंद्रपूर महामार्गावर असून ही  महिला टेमुरड्याला जाण्यासाठी येनसा येथील बस स्टॉप वर आली. रस्ता ओलांडत असताना खान रोड लाईन्स कंपनीचा हायवा ट्रक क्रमांक MH40 BG 0292 याने वृद्धेला धडक दिली धडक एवढी जबरदस्त होती की वृद्ध महिलेच्या शरीराचा  अक्षरश: चेंदामेंदा झाला शरीराचे तुकडे जमा करण्यासाठी पोलिसांना तारेवरची कसरत करावी लागली अपघात घडताच हायवा ट्रक मधील चालक आणि  क्लीनर ट्रक सोडून पळून गेले असून त्यांनी पोलीस स्टेशनला आत्मसमर्पण केल्याचे समजते.गतिरोधक बनवण्याची ग्रामस्थांची मागणी   :    
येनसा हे गाव नागपूर चंद्रपूर महामार्गावर असल्यामुळे येथून बांद्रा कोंढाळा बोरगाव सोसायटी आणि इतर परिसरातील गावातून अनेक विद्यार्थ्यांना आणि ग्रामस्थांना शिक्षणासाठी आणि इतर कामानिमित्त टेमुरडा  वरोरा याठिकाणी रस्ता ओलांडून जावे लागते महामार्गावरून भरधाव वेगाने जाणाऱ्या वाहनाने अनेकांचे बळी जाण्याची शक्यता नाकारता येत नाही यामुळे या ठिकाणी गतिरोधक बनवण्याची मागणी ग्रामस्थांकडून केली जात आहे वृत्त महिला ही निराधार योजनेच्या पैशाची उचल करण्यासाठी टेमुरडा येथे जात असल्याचे कळते.