दुर्दैवी : निरोप समारंभ ठरला आयुष्याचा निरोप : जड वाहनाने दुचाकीस मागून ठोकले - दहावीच्या विद्यार्थ्यांचा दुर्दैवी मृत्यू :घटनास्थळी रक्ताचा पाट #road accident - Khabarkatta ✒ खबरकट्टा

           Khabarkatta ✒ खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'

दुर्दैवी : निरोप समारंभ ठरला आयुष्याचा निरोप : जड वाहनाने दुचाकीस मागून ठोकले - दहावीच्या विद्यार्थ्यांचा दुर्दैवी मृत्यू :घटनास्थळी रक्ताचा पाट #road accident

Share This
निरोप समारंभाला जाताना अपघात; विद्यार्थ्यांचा मृत्यू ; आवाळपूर-गाडेगाव रोडवर  दुचाकीला पाठीमागून एका अज्ञात वाहनाने ठोकले ; घटनास्थळी रक्ताचा पाट खबरकट्टा / चंद्रपूर : कोरपना प्रतिनिधी -हबीब शेख 
काही दिवसातच दहाव्या वर्गाच्या परिक्षेला सुरुवात होणार असुन आज शाळेचा  शेवटचा दिवस असल्याने निरोप संमारंभाचा कार्यक्रमासाठी निघालेल्या  विद्यार्थ्यांचा रस्तावरील  अपघातात मृत्यू झाला आहे. कोरपना तालुक्यातील गाडेगाव ते आवाळपुर मार्गावर गाडेगाव येथे दुपारी 12 वाजता एका अज्ञात वाहनाने ठोकरल्याने ही दुर्घटना घडली. गडचांदुर पोलीस ठाण्यात याप्रकरणी अज्ञात वाहनचालकाविरूध्द गुन्हा दाखल झाला आहे.

प्राज्वल ओमप्रकाश राजुरकर(वय १७, रा. गाडेगाव, ता. कोरपना) असे दुर्दैवी मृत विद्यार्थ्यांनचे नाव आहे. तो पंडित जवाहरलाल नेहरु विद्यालयात शिकत होता.


आज 26 फेब्रुवारी दुपारी 12 वाजताच्या सुमारास प्राज्वल राजुरकर  आपल्या दुचाकीवर  आवारपुरकडे निघाला  होता.  तेव्हा गाडेगावजवळ त्यांच्या दुचाकीला पाठीमागून एका अज्ञात वाहनाने जबर धडक दिली. त्यात   तो गंभीर जखमी होऊन रस्त्यावर अक्षरशः  रक्ताचा पाट वाहून जागीेच मृत  पावला.   

अपघात झाल्यानंतर संबंधित अज्ञात वाहनचालकाने अपघातस्थळी न थांबता आणि जखमींना मदत न करता तशाच सुसाट वेगाने पलायन केले. गडचांदुर पोलीस ठाण्यात संबंधित अज्ञात वाहनचालकाविरूध्द गुन्हा दाखल केला आहे.