रेल्वे रुळावर कटून युवकाचा मृत्यू : rail - Khabarkatta ✒ खबरकट्टा

           Khabarkatta ✒ खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'

रेल्वे रुळावर कटून युवकाचा मृत्यू : rail

Share This
खबरकट्टा / चंद्रपूर :

माजरी जंक्शन-माजरी खदान या रेलवे मार्गावर  युवकाचा कटुन मृत्यु झाल्याची घटनाघडली असून दिलीप बाबूलाल जगदेपवार (३६) असे मृत युवकाचे नाव आहे.माजरी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मृतक हा वार्ड क्र.४ झेंडा दफाई येथील रहिवाशी असून शुक्रवारी सकाळी एसीएस कंपनी घुग्गुस येथे कामावर गेला होता. सायंकाळी ८.३० वाजता कामावरुन माजरी परत आला. दरम्यान आंघोळ करून आंबेडकर चौकात फिरायला गेला. मृतक हा परत घरी  येत असताना रात्री १०.३० वाजेच्या दरम्यान माजरी जंक्शन ते माजरी खदान कड़े भरधाव वेगाने येणाऱ्या मालवाहक रेल्वे गाडीने कटुन मरण पावला. दरम्यान परिसरातील नागरिकांनी झालेल्या घटनेची माहिती माजरी पोलिसांना दिली. माहिती मिळताच  तात्काळ दखल घेत माजरी पोलिसांनी घटनास्थळ गाठुन शवपंचनामा  करून मृतदेह उत्तरीय तपासणी करिता  उपजिल्हा रुग्णालय वरोरा येथे पाठविण्यात आले.पुढील तपास ठाणेदार सदाशिव ढाकणे यांच्या मार्गदर्शनात पोहा. गजानन तुपकर, पोशि. गुरु शिंदे हे करीत आहे.