पुलवामा हल्ल्यातील वीरशाहीदानां वर्षपूर्ती स्मरणार्थ विरूर वासियांची आदरांजली #pulwamaattack - Khabarkatta ✒ खबरकट्टा

           Khabarkatta ✒ खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'

पुलवामा हल्ल्यातील वीरशाहीदानां वर्षपूर्ती स्मरणार्थ विरूर वासियांची आदरांजली #pulwamaattack

Share This
खबरकट्टा / चंद्रपूर : राजुरा -

आज दिनांक 14 फरवरी 2019 काश्मीरच्या पुलवामामध्ये दहशतवादी हल्ल्यात ४० जवान शहीद झाले. यात महाराष्ट्रातील बुलडाणा जिल्ह्यातील नितीन राठोड आणि संजयसिंह राजपूत या दोन सुपुत्रांनाही वीरमरण आले. या भ्याड हल्ल्याला आज वर्ष लोटले असून शहीद झालेल्या वीर जवानांना श्रद्धांजली देण्याकरिता विरूर स्टेशन येथे रॅली काढण्यात आली. 

वीर जवानांच्या स्मरणार्थ या रॅली ची सुरुवात छत्रपती शिवाजी महाराज चौकापासून सुरुवात होऊन शहीद जवान चौक बस स्टॉप पर्यंत काढण्यात आली व देशाच्या रक्षणाकरिता स्वतःचे प्राण जमविलेल्या या योध्यांना उपस्थित सर्व विरूर वासीय  व युवकानीं  मोठ्या प्रमाणात सहभाग घेऊन आदरांजली अर्पण केली. 

या कार्यक्रमाचे नियोजन शिवाजी महाराज चौक कमिटी,  भाजपा युवा मोर्चाचे हितेश गाडगे, योगेश बक्षी ,शिवसैनिकतुषार मोरे ,चेतन मेश्राम , सुरज भोसकर  अमोल उराडे ,प्रणय एरोजवार ,सुधाकर मोरे, विनोद बोधे, शाहुजी नारनवरे, संतोष श्रीकोंडावार, आदी सामाजिक संघटना यांच्या वतीने करण्यात आले होते.