जिवतीत प्लास्टिक बंदी केवळ कागदावरच ? सर्रास वापर होत असतानाही प्रशासन मात्र मूग गिळून गप्प #plasticban. - Khabarkatta ✒ खबरकट्टा

           Khabarkatta ✒ खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'

जिवतीत प्लास्टिक बंदी केवळ कागदावरच ? सर्रास वापर होत असतानाही प्रशासन मात्र मूग गिळून गप्प #plasticban.

Share This
खबरकट्टा / चंद्रपूर - जिवती :- संतोष इंद्राळेमहात्मा गांधी यांच्या 150 व्या जयंतीचे निमित्त साधून दोन वर्षा आधी पर्यावरणाची हाणी करणाऱ्या प्लास्टिकचा वापर करू नये, असे 73 व्या स्वातंत्र्यदिनानिमित्त लाल किल्ल्यावरून पंतप्रधान मोदी यांनी देशवासियांना आवाहन केलं होत,पर्यावरण संरक्षण अधिनियम 1986 अन्वये शासनाने 50 मायक्रोनपेक्षा कमी जाडीच्या प्लास्टिक विक्रीवर बंदी घातली आहे.

मात्र त्याची अंमलबजावणी जिवती शहरात होताना दिसत नाही आहे,इथे प्लास्टिक बंदी हा निर्णय केवळ अनेक बाबतीत  कागदावरच असल्याचे दिसून येत आहे.खबरकट्टाच्या प्रतिनिधीने केलेल्या पाहणीत शहरात मोठया प्रमाणात प्लास्टिक पिशव्यांची बिनधास्त देवाणघेवाण सुरू असल्याचे दिसून येत आहे, प्लास्टिक बंदी लागू झाल्यानंतर काही काळासाठी प्रशासनाने गाजावाजा करत दंडात्मक व प्लास्टिक जप्तीचा  कारवाईचा बडगा उगारल्यानंतर जिवती शहरातून काही काळासाठी बंदी योग्य प्लास्टिकच्या वस्तू व प्लास्टिक गायब झाले.पण कालांतराने प्रशासनाची कारवाई क्षीण होताच दुकानदार,फेरीवाले,भाजीवाले यांच्या जवळ आणि ग्राहकांच्या हातात पुन्हा मोठया प्रमाणात प्लास्टिकच्या पिशव्या दिसू लागल्या आहेत,याच प्लास्टिक पिशव्या मुळे शहरातील नाल्या तुंबविण्यात या प्लास्टिक चा मोलाचा वाटा आहे,या मुळे शहरातील भटकी जनावरे,गाई ,म्हशी,यांनाही मोठया आजारांना सामोरे जावे लागत आहे,जिकडे तिकडे केवळ प्लास्टिक कचरा दिसत आहे, लग्न व इतर कार्यक्रमात प्लास्टिकचे ग्लास,पत्रावळ्या याचा मोठया प्रमाणात वापर होत आहे.

त्यामुळे पर्यावरणावर व नागरिकांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होताना दिसत आहे म्हणून प्रशासनाकडून महिन्यात  एकदा तरी अचानक कडक कारवाईचा बडगा या प्लास्टिक धारकावर उगारला पाहिजे अशी जनतेची मागणी आहे.