ओबीसी युवा अधिकार मंचचे २२ फेब्रुवारीला नागपूर येथे धरणे आंदोलन #obcjanganana - Khabarkatta ✒ खबरकट्टा

           Khabarkatta ✒ खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'

ओबीसी युवा अधिकार मंचचे २२ फेब्रुवारीला नागपूर येथे धरणे आंदोलन #obcjanganana

Share This
खबरकट्टा / नागपूर :

ओबीसी युवा अधिकार मंचच्यावतीने २२ फेब्रुवारी २०२० रोजी सकाळी ११ ते दुपारी ४ वाजेपर्यंत संविधान चैक नागपूर येथे जातीनिहाय ओबीसी जनगणना या प्रमुख मागणीसाठी धरणे आंदोलनाचे आयोजन करण्यात आले आहे. 

ओबीसीची जातीनिहाय जनगणना करावी, केंद्रात ओबीसींसाठी स्वतंत्र मंत्रालय व लोकसंख्येच्या आधारावर बजेटमध्ये तरतूद करावी, केंद्र व राज्य सरकारच्यावतीने विभाग व जिल्हास्तरावर ओबीसी विद्याथ्र्यांसाठी स्वतंत्र वसतिगृह निर्माण करावे, ओबीसी क्रिमीलेअरसाठी स्थापन केलेली बी. पी. श्र्मा कमिटीच्या अहवाल जाहीर करावे, केंद्रीय स्तरावरील सर्व परीक्षांची शुल्क एससी, एसटी प्रमाणे ओबीसींसाठी लागू करावी, आदी मागण्यांसाळी धरणे आंदोलन आयोजित करण्यात आले आहे. 

या आंदोलनात जास्तीत जास्त ओबीसी बांधव व युवकांनी सहभागी व्हावे, असे आवाहन उमेश कोर्राम, निकेश पिने, राम वाडीभस्मे, राजेश राजगिरे, डाॅ. सिद्धांत भरणे, पियुष आकरे, कृताल वेलेकर, अनिकेत कुत्तरमारे, ॲड. स्मिता कांबळे, उमेश ढुमणे, ॲड. किशोर वैरागडे, असलम खातमी, रोशन नव्हाते, दिनेश चौधरी, मनीष गिरडकर, आकाश जाधव, अभिनय लाकडे, चेतन तरारे, महेंद्र दिवटे, मोंटू खडके, राकेश कैकाडे, निलेश कोढे, जगदीश वाडीभस्मे, राजेश मेंढे, निकेश ढोके यांनी केले आहे.