ओबीसीचे ७ जिल्हयातील कमी झालेले आरक्षण पूर्ववत करणार:ना.विजय वडेट्टीवार #obc #vijaywadettiwar - Khabarkatta ✒ खबरकट्टा

           Khabarkatta ✒ खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'

ओबीसीचे ७ जिल्हयातील कमी झालेले आरक्षण पूर्ववत करणार:ना.विजय वडेट्टीवार #obc #vijaywadettiwar

Share This
खबरकट्टा / चंद्रपूर :

महाराष्ट्रातील सात जिल्ह्यांमध्ये ओबीसींचे आरक्षण कमी करण्यात आले आहे. कमी झालेले हे आरक्षण पूर्ववत करण्यासाठी आपण प्रयत्न करणार असल्याचे प्रतिपादन राज्याचे मदत व पुनर्वसन, इतर मागास वर्ग, सामाजिक व शैक्षणिक मागास प्रवर्ग, विमुक्त जाती भटक्या जमाती आणि विशेष मागास प्रवर्ग कल्याण खारजमीन विकास तथा पालकमंत्री चंद्रपूर विजय वडेट्टीवार यांनी आज येथे केले.

चंद्रपूर येथे ते चार दिवसांच्या दौऱ्यावर पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांचे आगमन झाले आहे. आज दुपारी येथील वन विश्रामगृहावर पत्रकारांशी बोलताना त्यांनी 1996 मध्ये जे आरक्षण ओबीसींचे कमी झाले ते आरक्षण पूर्ववत करण्यासाठी आगामी कॅबिनेटमध्ये आपण प्रस्ताव सादर करणार असल्याचे सांगितले.राज्यात आता किती आरक्षण असावे यावर कमाल मर्यादा नाही. त्यामुळे यापूर्वी आदिवासी जिल्ह्यांमध्ये आदिवासींच्या आरक्षण वाढविण्यासाठी ओबीसींचे आरक्षण कमी करण्यात आले होते. त्यामुळे राज्यातील चंद्रपूर, गडचिरोली, यवतमाळ, धुळे ,नंदुरबार, पालघर व ठाणे या सात जिल्ह्यातील ओबीसींचे आरक्षण कमी केल्या गेले. यामध्ये १९ टक्के असणारे आरक्षण अनेक ठिकाणी कमी केले गेले. यामध्ये चंद्रपूरचे ९ टक्के, गडचिरोलीचे ६ टक्के यवतमाळचे ११ टक्के व याच तुलनेत अन्य आरक्षण कमी करण्यात आले. आता ५० टक्क्यांची मर्यादा राहिली नाही. त्यामुळे या भागातील ओबीसींना त्यांचा न्याय्य हक्क मिळावा यासाठी या सातही जिल्ह्यातील कमी झालेल्या आरक्षण पूर्ववत व्हावे, यासाठी आपण पुढील कॅबिनेटमध्ये यासंदर्भात पाठपुरावा करू असे प्रतिपादन त्यांनी केले आहे.