कचऱ्यामध्ये आढळले नवजात अर्भक #Newborn infants found in the trash - Khabarkatta ✒ खबरकट्टा

           Khabarkatta ✒ खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'

कचऱ्यामध्ये आढळले नवजात अर्भक #Newborn infants found in the trash

Share This
खबरकट्टा प्रतिनिधी / गडचिरोली : जिल्हा मुख्यलयापासून १५ किमी अंतरावर असलेल्या पोर्ला येथील झुडपात नवजात बालकाचे अर्भक आढळल्याची घटना आज २२ फेब्रुवारीला  उघडकीस आली आहे. नवजात अर्भकाला  गडचिरोली येथील महिला रुग्णालयात दाखल केले असून त्यावर उपचार सुरू आहे.


सदर नवजात अभ्रक हे कचऱ्याच्या ठिकाणी काही  नागरिकांना आढळून आले असता याची माहिती सर्वत्र पोहचली . कोणीतरी आपण  केलेले पाप लपविण्यासाठी या नवजात अर्भकाला  जन्म देऊन टाकून दिले असल्याची चर्चा आहे . काही नागरिक कचऱ्याच्या ठिकाणी गेले असता त्यांना हे नवजात अर्भक आढळून आले. पुढील तपास गडचिरोली पोलीस करीत आहे .