राष्ट्रीय एकता शिबिरासाठी महाराष्ट्राचा संघ झारखंडला रवाना #ncc - Khabarkatta ✒ खबरकट्टा

           Khabarkatta ✒ खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'

राष्ट्रीय एकता शिबिरासाठी महाराष्ट्राचा संघ झारखंडला रवाना #ncc

Share This
खबरकट्टा / चंद्रपूर : राजुरा -


युवा व खेल मंत्रालय, भारत सरकार तथा राष्ट्रीय सेवा योजना क्षेत्रीय निदेशालय पटना, बिहार यांच्या संयुक्त विद्यमाने विनोबा भावे विद्यापीठ हजारीबाग झारखंड येथे दिनांक 28 फेब्रुवारी ते 5 मार्च 2020 या कालावधीत होऊ घातलेल्या राष्ट्रीय एकता शिबिरात महाराष्ट्र राज्याचा 5 मुले, 5 मुली आणि एक कार्यक्रम अधिकारी असा गोंडवाना विद्यापीठाअंतर्गत श्री शिवाजी कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय राजुरा येथील  संघ सहभागी  होत आहे.

यामध्ये या संघाचे संघनायक म्हणून श्री शिवाजी महाविद्यालयातील रासेयो कार्यक्रम अधिकारी प्रा. गुरुदास बालकी तसेच या संघात बालाजी ताजने, सिद्धांत कांबळे, दीपक राजूरकर, प्रतीक डाखरे, कुणाल ठेंगरे, कु. नमीरा सय्यद, आरती भालेराव, दीपाली वांढरे, रुपाली चव्हाण, प्रतीक्षा पडवेकर इ. राष्ट्रीय सेवा योजना पथकाचे स्वयंसेवक  राष्ट्रीय सेवा योजना क्षेत्रीय निदेशालय, पुणे (महाराष्ट्र) तसेच गोंडवाना विद्यापीठ गडचिरोली येथील रासेयो संचालक डॉ. नरेश मडावी यांच्या मार्गदर्शनाखाली हा संघ सहभागी होत आहेत.

या सात दिवसात महाराष्ट्र राज्यातील विविधांगी संस्कृतीचे प्रदर्शन शिबिरात सहभागी होत असलेल्या इतर राज्यातील स्वयंसेवकासमोर करणार आहे.संपूर्ण भारतातील विविध राज्याच्या संस्कृतीचे आदानप्रदान व्हावे, राष्ट्रीय एकात्मता वाढीस लागावी या उद्देशाने शिबिराचे आयोजन करण्यात येत आहे.