चंद्रपूर ब्रेकिंग : दारूड्या भावाच्या डोक्यात दगड घालून खून ! #Murder - Khabarkatta ✒ खबरकट्टा

           Khabarkatta ✒ खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'

चंद्रपूर ब्रेकिंग : दारूड्या भावाच्या डोक्यात दगड घालून खून ! #Murder

Share This
खबरकट्टा /चंद्रपूर : ब्रम्हपूरी : 

दारू प्राशन करून घरच्या मंडळींना नेहमी त्रास देणार्‍या सख्या भावाच्या डोक्यात दोन धाकट्या भावांनी दगड घालून निर्घूण खून केल्याची घटना ब्रम्हपुरी तालुक्यातील सोद्री या गावी मंगळवारला रात्री ८.४५ वाजता घडली. 


मृतकाचे नाव प्रमोद बंडोजी जिरीतखान वय ३४ असे अपनं मृतकाचे सख्ये भाऊ आरोपी रेशम बंडोजी जिरीतखान व प्रेमलाल बंडोजी जिरीतखान रा. सोंद्री असे आहे. यांना पोलिसांनी अटक केली आहे. फिर्यादी पोलिस पाटील गिरीधर तुकाराम देशमुख यांनी दिलेल्या तक्रारीवरून मौजा सोंद्री येथील शेवंता बंडोजी जिरीतखान यांना तीन मुल असून ते संयुक्त एकत्र कुटूंबात वास्तव्य करतात. यातील आरोपी रेशम बंडोजी जिरीतखान याने पोलिस पाटील गिरीधर देशमुख यांना माझा भाऊ प्रमोद हा स्लॅब वरून पडला असे सांगितले असता, त्यास दवाखान्यात नेण्याचा सल्ला दिला. त्यावेळी आरोपी रेशम हा घराकडे निघून गेला. सदर घटनेची शहानिशा करण्यासाठी पोलिस पाटील देशमुख हे त्याच्या पाठोपाठ त्याच्या घराकडे गेले असता, प्रमोद हा खाटेवर निचपत पडलेला दिसून आला. 


तसेच त्याच्या गालावरील दोन्ही कानाच्या मागे गंभीर जखमेमुळे रक्तप्रवाह होत असल्याचे व गंभीर अवस्थेत शेवटचे क्षण मोजत असल्याचे निर्दशनास आले. तसेच रक्ताने माखलेले डाग व पायरीजवळ रक्ताने माखलेला दगड दिसून आल्यामुळे पोलिस पाटील देशमुख यांना संशय आल्याने त्यांनी आरोपी रेशम व प्रेमलाल यांना मृतक प्रमोद यास दवाखान्यात नेण्याचे सांगितले असता, त्यांनी नकार दिला. 


घटनास्थळी मृतकाचा चुलत मामा प्रभाकर मुखरू दोनाडकर यांनी मृतक प्रमोद यास उपचारार्थ दवाखान्यात दाखल केले. आरोपी रेशम बंडोजी जिरीतखान याने आपल्या मामास प्रमोद दारू पिऊन त्रास देत असल्यामुळे त्याच्या डोक्यात दगड घालून निर्घूण हत्या केल्याची कबूली दिली. त्यावरून सदर घटनेची माहिती पोलिस पाटील देशमुख यांनी पोलिस स्टेशनाला दिली. 


डोक्यात दगड घालुन खून केल्याप्रकरणी आरोपी रेशम बंडोजी जिरीतखान व प्रेमलाल बंडोजी जिरीतखान यांच्या विरुद्ध ब्रम्हपुरी पोलिस ठाण्यात भादंवि कलम ३०२, सहकलम ३४ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घटनेचा तपास चिमूर येथील प्रभारी उपविभागीय पोलिस अधिकारी इंगोले यांच्या मार्गदर्शनाखाली ब्रम्हपुरीचे ठाणेदार तथा पोलिस निरीक्षक प्रमोद मकेश्वर हे करीत आहेत.