बसस्थानकावर बसखाली चिरडल्याने महिलेचा मृत्यू : चालकावर गुन्हा दाखल #mul - Khabarkatta ✒ खबरकट्टा

           Khabarkatta ✒ खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'

बसस्थानकावर बसखाली चिरडल्याने महिलेचा मृत्यू : चालकावर गुन्हा दाखल #mul

Share This
खबरकट्टा / चंद्रपूर :मूल प्रतिनिधी -


चंद्रपूर जिल्ह्यातील मुल बसस्थानक येथे एका महिलेचा बस क्र. MH 34  5258 च्या चाकाखाली येऊन मृत्यू झाला.

मुल येथील प्रभाग क्र.1 मधील रहिवासी प्रकाश वड्डमवार हे आपल्या सौ.लता वड्डममवार पत्नीसह चंद्रपूरला जाण्यासाठी बसस्थानकावर आले होते. याचवेळी गडचिरोली वरून  चंद्रपूरला जाणाऱ्या बसच्या चाकाखाली आल्या,चालकाचे लक्ष नसल्यामुळे प्रवाश्यांनी आरडा ओरडा केल्यानंतर बस थांबविण्यात आली.

तेव्हा नागरिकांनी तिला बसच्या चाकाबाहेर काढले परंतु ती काहीच प्रतिसाद देत नव्हत्या.सदर घटनेची माहिती मुल बसस्थानकाचे वाहतूक निरीक्षक श्री.दिलीप ईटनकर यांनी मुल पोलीस ठाण्यात दिली,पोलीस तात्काळ घटनास्थळी दाखल होऊन आपल्या वाहनात सदर महिलेला मुल येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले असता,वैद्यकीय अधिकारी यांनी महिलेला मृत घोषित केले.

रुग्णालयात महिलेचे शवविच्छेदन करण्यात आले आहे.बस चालक राहुल गडे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास मुल पोलिस स्टेशन तर्फे सुरू आहे.