मॉर्निंग वॉक करणा-या इसमाचा अपघाती मृत्यू #morningwalk - Khabarkatta ✒ खबरकट्टा

           Khabarkatta ✒ खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'

मॉर्निंग वॉक करणा-या इसमाचा अपघाती मृत्यू #morningwalk

Share This
खबरकट्टा / यवतमाळ :


मॉर्निंग वॉक करण्यासाठी भल्या पहाटे घराबाहेर पडलेल्या इसमास अज्ञात वाहनाने जबर धडक दिली. या अपघातात त्यांचा मृत्यू झाला. रविंद्र आनंदराव पिसे( वय ५० ) असे मृताचे नाव आहे.


रविंद्र पिसे हे मुळचे जवळा (ता.आर्णी) येथील रहिवाशी होते.आर्थिक परिस्थिती जेमतेम असल्याने कामाच्या शोधात ते महागाव शहरात आले. हाताला मिळेल ते काम करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करीत होते. मागील पाच महिन्यापासून ते येथील गॅस एजंसीमध्ये कर्मचारी म्हणुन
कार्यरत होते. 

काल 9 फेब्रुवारी सकाळी साडेपाच वाजता ते मॉर्निंग वॉकसाठी निघाले.मालाणी लेआऊट नजीक राष्ट्रीय महार्गावर अज्ञात वाहनाने त्यांना जबर धडक दिली. यात ते गंभीर जखमी झाले. सामाजिक कार्यकर्ते नंदकुमार कावळे यांनी धावपळ करून त्यांना उपचारासाठी हलविले; परंतू वाटेतच त्यांचा मृत्यू झाला. रविंद्र पिसे यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा, एक मुलगी आणि मोठा आप्त परिवार आहे. पिसे यांच्या पार्थिवावर जवळा या मुळ गावी अंत्यसंस्कार करण्यात आले.