आदिवासी शेतकऱ्यांना न्याय द्या व दोषी अधिका-यावर कार्यवाही करा - माजी आमदार अँड. संजय धोटे यांची मागणी #manikgarhcement - Khabarkatta ✒ खबरकट्टा

           Khabarkatta ✒ खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'

आदिवासी शेतकऱ्यांना न्याय द्या व दोषी अधिका-यावर कार्यवाही करा - माजी आमदार अँड. संजय धोटे यांची मागणी #manikgarhcement

Share This
खबरकट्टा / चंद्रपूर : 

मानिकगड सिमेंट लगतच्या कुसूंबी येथील आदिवासी शेतकरी मागील  अनेक वर्षांपासून महसूल प्रशासनाच्या चुकिची शिक्षा भोगत असुन पीडित आदिवासी त्यांच्या वर झालेल्या अन्याया विरोधात सातत्याने संघर्ष करित आहेत. पंरतु  ह्या आंदोलनाकडे माणिकगड प्रशासन जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत असून, कंपनीने आदिवासी शेतकऱ्यांच्या जमिनी कोणताही मोबदला न देता बळजबरीने हिरावून व गावातील मुख्य दळणवळणाचा रस्ता रोखुन सातत्याने दडपशाही चालवली आहेत. 

मागील ३ वर्षांपासून कंपनी प्रशासना सोबत अनेकदा बैठका झाल्या. प्रशासन अधिकारी वेळ काढुपणाचे धोरण चालवीत असल्याने ,प्रशासनावर विश्वास ठेवता येणार नाही.कुसूंबी प्रकरणात आदिवासींना योग्य न्याय त्वरित मिळण्यासाठी लक्ष वेधण्याकरिता  कुसंबी येथील देऊ कुळमेथे या ७८ वर्षिय वुध्दाने आपल्यावर झालेल्या अन्याया विरुद्ध सातत्याने संघर्ष केला पंरतु न्याय मिळाला नाहीत. 

अखेर कुसंबी येथील आदिवासी शेतकऱ्यांनी शनिवार 15 फेब्रुवारी ला ह्या गंभीर रित्या आजारी असलेल्या ह्या वुद्धासह  तहसील कार्यालयात आदोलन केले. ह्या आजारी वुध्दाला खाटेसह तहसील कार्याल्याच्या आवारात आणुन ठेवले .परंतु ह्या आदिवासी शेतकऱ्यांना न्याय देण्याऐवजी पोलीस व महसूल प्रशासनाने ह्या शेतकऱ्यांना रुग्णालयात दाखल तर केले परंतु अनेक तासापर्यत ह्या वुद्धावर कुठलेही उपचार करण्यात आले नाही. 

कुसंबी येथील आदिवासी शेतकऱ्यांच्या असुन वारंवार आश्वासन देऊनही महसूल प्रशासन आपल्या अधिका-याच्या चुकावर पांघरून घालण्यासाठी मानिकगड सिमेंट व्यवस्थापनाच्या मदतीने दडपशाही धोरण राबवून आदिवासी चे दमन  करीत असून महसूल प्रशासन ,वनविभाग ,व खनिज विकास विभागच्या अधिकाऱ्यांच्या चुकांवर पांघरुण घालण्याचा प्रयत्नात चौकशी टाळल्या जात आहे. या संदर्भात वारंवार तक्रारी करूनही चौकशी केल्या जात असल्याचे सांगत  दिरंगाई करित आहेत. महसूल प्रशासनातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी ह्या  प्रकरणात तात्काळ लक्ष घालून ह्या.बाबतीत तात्काळ चौकशी करण्याचे आदेश द्यावेत. प्रकरणातील दोषी अधिका-यावर तात्काळ कार्यवाही करावी. अन्यथा ह्या आदिवासी शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी रस्त्यावर उतरू असा  इशारा माजी आमदार अँड. संजय धोटे यांनी प्रशासनाला दिला आहे.