मला वैताग आलाय, ह्या कायदे राबविणार्या लोकांचा :महिला अत्याचाराच्या वाढत्या घटनांवर चंद्रपुरातील सुप्रसिद्ध शक्य चिकित्सक व समाजसेविका डॉ. शरयू पाझारे यांची वेधक प्रतिक्रिया #mahilaatyachar - Khabarkatta ✒ खबरकट्टा

           Khabarkatta ✒ खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'

मला वैताग आलाय, ह्या कायदे राबविणार्या लोकांचा :महिला अत्याचाराच्या वाढत्या घटनांवर चंद्रपुरातील सुप्रसिद्ध शक्य चिकित्सक व समाजसेविका डॉ. शरयू पाझारे यांची वेधक प्रतिक्रिया #mahilaatyachar

Share This
खबरकट्टा /चंद्रपूर : 

महिला अत्याचाराच्या वाढत्या घटनांवर चंद्रपुरातील सुप्रसिद्ध शक्य चिकित्सक व समाजसेविका डॉ. शरयू पाझारे यांची वेधक प्रतिक्रिया थेट त्यांच्या फेसबुक अकाउंट वरून... त्यांच्या शब्दात... !!

मला वैताग आलाय, ह्या कायदे राबविणार्या लोकांचा , ज्यांच्यावर अन्याय होतो ,त्यांच्या वकिलांपेक्षा ,  ज्यांनी अन्याय केला त्यांचे वकील आपापल्या आरोपींना कसे सोडवता येणार, ह्यासाठी जीवाची बाजी लावून लढतात , जज ची भुमिका नेमकी काय असते , हा। पण ऐक प्रश्न आहे. ?म्हणूनच आरोपी लोकांना भीतीच राहीली नाही. आणि म्हणूनच ऐक म्हण आहे, " की शहाण्या लोकांनी कोर्टाची पायरी चढू नये". पण कोणातरी वाईट प्रवृत्ती च्या लोकांमुळे, " सभ्य लोकांना ही पायरी चढावी लागते ,,, आणी ऐक वेगळा " मानसिक छळाचा गेम " चालू होतो , आणि चांगले लोक , न्याय मिळेल म्हणून, ""तारखांच्या आकड्यात अडकतात,  मानसिक आणि आर्थिक चुराड्यात मरगळत राहातात ........!!