अखेर मूर्ती विमानतळाचा मार्ग मोकळा : खासदारांच्या भद्रावती स्थानांतरन प्रस्तावाला एमएडीसीची बगल : मूर्ती येथील वनजमीन संपादनाला प्रारंभ : दीड महिन्यात प्रक्रिया पूर्ण होण्याची शक्यता #MADC - Khabarkatta ✒ खबरकट्टा

           Khabarkatta ✒ खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'

अखेर मूर्ती विमानतळाचा मार्ग मोकळा : खासदारांच्या भद्रावती स्थानांतरन प्रस्तावाला एमएडीसीची बगल : मूर्ती येथील वनजमीन संपादनाला प्रारंभ : दीड महिन्यात प्रक्रिया पूर्ण होण्याची शक्यता #MADC

Share This
खबरकट्टा / चंद्रपूर : राजुरा -


चंद्रपूर जिल्ह्यातील राजुराजवळील मूर्ती येथे नवीन प्रस्तावित विमानतळासाठी १८५.९२ एकर वनजमिनीचे संपादन प्रकियेला प्रारंभ झाला असून येत्या दीड महिन्यात पूर्ण होण्याची शक्यता  आहे.  

राजुरा तालुक्यातील विहीरगाव मूर्ती येथे नवीन विमानतळ प्रस्तावित आहे. चंद्रपूर शहरापासून सुमारे ४० किलोमीटर अंतरावर हे विमानतळ होत आहे. विद्यमान विमानतळ चंद्रपूर शहरालगत मोरवा  येथे आहे. प्रस्तावित विमानतळ दोन टप्यात विकसित केले जाणार आहे. 

पहिल्या टप्यात ७२० एकर जमीन आव्यश्यक आहे. त्यासाठी शासकीय, वनजमीन आणि खासगी जमीन लागणार आहे. राज्य सरकारीची जमीन महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनी ला मिळाले आहे. वनजमिनीचे संपादन करण्यात येत आहे. सोबत खासगी जमिन संपादना साठी देखील प्रक्रिया सुरु आहे. भूसंपादानाची प्रक्रिया  सुरु असतानाच चंद्रपूर खासदार बाळू धानोरकर यांनी विमानतळाची जागा बदलण्याची मागणी केली होती.  परंतु तांत्रिकदृष्ट्या विमानतळ भद्रावती तालुक्यात स्थानांतरित करणे  हि मागणी व्यवहार्य नसल्याचे खासदारांच्या प्रश्नावर  एमएडीसीचे  म्हणणे आहे.  अंतिम ठिकाणी निवडण्यासाठी भद्रावती चा देखील विचार झाला होता. परंतु उच्च दाब वीज वाहिनी आणि शस्त्रनिर्मिती कारखाना तसेच जवळ असलेल्या खाणीमुळे या ठिकाणाचा विचार सोडावा लागला होता, असे एमएडीसीचे अधिकारी म्हणाले.