गॅस दरवाढीच्या विरोधात राष्ट्रवादी महिला काँग्रेसचे आंदोलन : गॅस सिलिंडरच्या किंमतीत १४५ रु. विक्रमी दरवाढीने गृहिणीचे बजेट कोलमडले #lpgcylenderhike - Khabarkatta ✒ खबरकट्टा

           Khabarkatta ✒ खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'

गॅस दरवाढीच्या विरोधात राष्ट्रवादी महिला काँग्रेसचे आंदोलन : गॅस सिलिंडरच्या किंमतीत १४५ रु. विक्रमी दरवाढीने गृहिणीचे बजेट कोलमडले #lpgcylenderhike

Share This
खबरकट्टा /चंद्रपूर : 
             

चंद्रपूर जिल्हा राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या जिल्हाध्यक्ष बेबी उईके यांच्या नेतृत्वात विना अनुदानित गॅस सिलिंडरच्या किंमतीत १४५ रु. विक्रमी दरवाढी झाल्याने केंद्र सरकारच्या निषेधार्थ 'बहोत' हुई महंगाई की मार, बस करो मोदी सरकार' झुटा वादा महंगाई जादा बंद करो बंद करो. 


'मोदी तेरे राज मे कटोरा आया हात मे' ,महंगा सिलेंडर, महंगा तेल मोदीजी आप सरकार चलाने मे हो गये फेल, महंगाई से मच गयी हाहाकार अब नही चाहीए मोदी सरकार, गॅस दरवाढ कमी करा अशा घोषणाबाजी करत केंद्र सरकारच्या विरोधात आंदोलन करून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना जिल्हाधिकारी मार्फत निवेदन पठविण्यात आले. 

महिला जिल्हाध्यक्ष बेबी उईके म्हणाल्या महंगाई कमी करू म्हणत देशातील जनतेला खोटे आश्वासन देऊन केंद्रात सत्ता मिळवली. आता मात्र मोदी सरकारने महागाईकडे दुर्लक्ष केले सर्व क्षेत्रात महागाईच्या खाईत जनता होरपळून निघत आहे . आज पासून तर गॅस सिलिंडरच्या किंमतीत १४५ रुपयांनी वाढ झालेली आहे. एका गॅस मागे सर्व सामान्यांना ८२९.५० रुपये मोजावे लागणार आहेत. त्यामुळे महिलांचा किचनचा बजेट कोलमळला आहे. 

गॅस दर कमी करण्याच्या मागणी करीता आंदोलन करण्यात आले यावेळी उपस्थित महिला जिल्हाधक्ष बेबी उईके, शहराध्यक्ष ज्योती रंगारी, जिल्हाउपाध्यक्ष वंदना आवळे, कार्यध्यक्ष चारुशीला बरसागडे, जिल्हासहसचिव शोभा घरडे, जिल्हासचिव हर्षा खैरकर, जिल्हासंघटक लता जांभूळकर, सरस्वती गावनडे, नंदा शेरकी, पुष्पा झाडे, राणी राय, नीलिमा नरवडे, स्वेता रामटेके, ज्योती कौठेकर, सुमित्रा वैद्य, पार्वती कामटकर, सुरेखा भोयर, उषा सहारे, सीमा ननावरे, अन्य महिला पदाधिकारी उपस्थित होत्या.