महाराष्ट्र राज्य कोतवाल संघटना शाखा यवतमाळ यांच्या वतीने विविध मागण्यांच्या पूर्तते करिता जिल्हाअधिकारी यांना निवेदन #kotwal - Khabarkatta ✒ खबरकट्टा

           Khabarkatta ✒ खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'

महाराष्ट्र राज्य कोतवाल संघटना शाखा यवतमाळ यांच्या वतीने विविध मागण्यांच्या पूर्तते करिता जिल्हाअधिकारी यांना निवेदन #kotwal

Share This
खबरकट्टा / यवतमाळ : 

शिपाई पदावर बढती तसेच जिल्ह्यातील वर्ग ड मध्ये पदोन्नतीस पात्र ठरलेल्या कोतवालांना दरमहा 15 हजार रुपये मानधन द्यावी या मागणीबाबत जिल्हाधिकारी यांना शुक्रवारी निवेदन देण्यात आले. यावेळी यवतमाळ जिल्यातून मोठ्या प्रमाणात कोतवाल संघटनेचे पदाधिकारी व सदस्य सहभागी झाले होते.

गेल्या अनेक वर्षांपासून पात्र कोतवालांना शिपाई पदी बढती द्यावी यासाठी आदोलन करण्यात येत आहे. दरवर्षी त्यांना याबाबत आश्वासन देण्यात येते. मात्र त्यावर कोणतीही कार्यवाही होत नाही. मागणी मान्य करावी यासाठी कोतवाल संघटना विविध आंदोलन नेहमीच करतात. शुक्रवारी कोतवालांच्या विविध मागणींसाठी जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आले.

या वेळी महाराष्ट्र राज्य कोतवाल संघटनेचे यवतमाळ जिल्हा अध्यक्ष अनिल मिलमिले, जिल्हा उपाध्यक्ष उत्तम पाचभाई, सचिव सुरेशराव येरमे,मारेगाव ता. सचिव अतुल बोबडे,अमोल लोंढे,सुभाष चव्हाण,हेमंत गेडाम,अजय पडलवार,प्रत्येक तालुक्यातून मोठ्या संख्येने कोतवाल संघटनेचे सदस्य उपस्थित होते.