संभाजी बिग्रेड एकोडी तर्फे शिवजन्मोत्सव उत्साहात साजरा #korpana - Khabarkatta ✒ खबरकट्टा

           Khabarkatta ✒ खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'

संभाजी बिग्रेड एकोडी तर्फे शिवजन्मोत्सव उत्साहात साजरा #korpana

Share This
खबरकट्टा / चंद्रपूर : प्रतिनिधी कोरपना :-हबीब शेखकोरपना तालुक्यातील एकोडी येथे संभाजी बिग्रेड तर्फे शिवजन्मोत्सवपर व्याख्यानाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.सदर कार्यक्रमाचे अध्यक्ष  सुरेद्र मंगाम वनरक्षक होते तर  कार्यक्रमाचे उद्घाटन गणेश मिलमिले यांनी केले. सदर कार्यक्रमास विशेष अतिथी म्हणून कोरपना पचायंत समितीच्या सभापती रुपाली तोडासे उपस्थित होत्या, प्रमुख मार्गदर्शक दिनेश पारखी तालुका अध्यक्ष मराठा सेवा संघ राजुरा यांनी जातीनिहाय ओबीसी जनगणना या विषयावर माहिती सांगितली तर टिपु सुल्तान फाऊंडेशन चंद्रपूर चे जिल्हा अध्यक्ष अमजद शेख यांनी शिवविचांराची आज किती प्रकाषाने गरज आहे. यावर विचार व्यक्त केले  सर्व नागरिकांनीही  त्यांच्या व्याख्यानाला प्रचंड दाद दिली. 

या कार्यक्रमाचे विशेष अतिथी मुकींंदा पवार,डॉक्टर गोसाई बोढे, प्रमुख पाहुणे कोरपना पंचायत समिती सभापती रुपाली ताई तोडासे ,दिनेश गोखरे होते तसेच या कार्यक्रमात गावातील पहिला इंजिनिअर नितीन राऊत ,जिल्हा परिषद शाळेतील शिक्षकांचाही  सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमाचे संचालन संजय बोढे यांनी केले तर प्रास्ताविक शकर बोढे आभार शेषराव  गौरकार यांनी व्यक्त केले.कार्यक्रम यशस्वी करण्याकरिता संभाजी ब्रिगेड च्या युवक महीलांनी अथक परिश्रम घेतले.