केवळ दाखल्यासाठी करावी लागते २५ किमीची पायपीट#jivti #rajura - Khabarkatta ✒ खबरकट्टा

           Khabarkatta ✒ खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'

केवळ दाखल्यासाठी करावी लागते २५ किमीची पायपीट#jivti #rajura

Share This
खबरकट्टा / चंद्रपूर : राजुरा -

जिवती नजीक गणेरी हे एकच गाव राजुरा तालुक्यात समाविष्ट असल्यानेर हिवाशी व ईतर दाखल्यासाठी २५ किमीची पायपीट नागरीकांना करावी लागत आहे.


विविध समस्यानी ग्रासलेला जिवती तालुकानेहमीच चर्चेत असतो. तालुका निर्मितीला एका तपाहुन अधिक कालावधी लोटला असून येथील जनतेच्या समस्या संपलेल्या नाही.तेलंगणा सीमेलगत असलेल्या जिवती तालुक्यातील वादग्रस्त बारा गावांचा प्रश्न उभा ठाकला असतानाच एक नवीन बाब समोर आली आहे.तालुक्यातील शेवटच्या टोकावर डोंगराळ भागात वसलेले गणेरी हे गाव विचित्र समस्याने ग्रासले आहे.

या गावात शैक्षणीक सुविधा म्हणून जिवती तालुक्यातील पंचायत समिती अंतर्गत १ ते ४ वर्ग असलेली जिल्हा परिषदची शाळा आहे.सदर गाव राजुरातालुक्यातील कावळगोंदीग्रामपंचायत अंतर्गत येत असूनशासकीय योजना गावापासून कोसो दूर आहे. ३० घरांची वस्ती असलेल्या गावात दिडशेच्या आसपास लोकसंख्या असून आदीवासी समाजाची संख्या जास्त आहे.