प्रधानमंत्री आवास योजनेतील राज्यशासनाचे मंजूर अनुदान उपलब्ध करून देण्यासाठी मा.सुभाष धोटे यांचे मा.श्री.जितेंद्र आव्हाड यांना निवेदन #jitendra avhad - Khabarkatta ✒ खबरकट्टा

           Khabarkatta ✒ खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'

प्रधानमंत्री आवास योजनेतील राज्यशासनाचे मंजूर अनुदान उपलब्ध करून देण्यासाठी मा.सुभाष धोटे यांचे मा.श्री.जितेंद्र आव्हाड यांना निवेदन #jitendra avhad

Share This
खबरकट्टा / चंद्रपूर - जिवती : संतोष इंद्राळे

प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत सन 2022 पर्यंत सर्वाना घरे देण्याचे उद्दिष्ट ठरविण्यात आले होते.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सर्वसामान्यांना घरे मिळावे यासाठी कालबद्ध कार्यक्रम राबविण्याचा मानस जाहीर केला होता,याची अंमलबजावणी शासन ठामपणे करेल आणि या दृष्टीने निर्णय घेण्यात येतील असे वाटत होते.

केंद्रशासना तर्फे दि.17 जून 2015 पासून सर्वासाठी घरे योजना मंजूर करण्यात आली व याची अंमलबजावणी दि.25 जून 2015 पासून राज्यात करण्यात आली पण चंद्रपूर जिल्ह्यातील राजुरा मतदार संघात प्रधानमंत्री आवास योजने अंतर्गत मंजूर डीपीआर नुसार राजुरा नगरपरिषद मध्ये 160 घरे,नगरपंचायत गोंडपिपरी मध्ये 139 घरे,जिवती नगरपंचायत मध्ये 664 घरे,कोरपना नगरपंचायत मध्ये 129 घरे मंजूर झाले होते मागील युती सरकारच्या काळात फक्त या कडे दुर्लक्ष करणयात आले.


तरी शासनाकडून मंजूर झालेल्या घरकुलाचा पहिला  मिळावा व अनेक गरजू लाभार्थ्यांचे स्वतःचे व  हक्काचे घरकुल मिळावे.यासाठी हे मंजूर घरकुल आतातरी प्रलंबित राहू नये म्हणून राजुरा मतदार संघातील तालुक्यातील मंजूर घरकुलाचे काम पूर्ण करण्यासाठी व राज्यशासनाचे मंजूर अनुदान मिळावे यासाठी मा.सुभाष धोटे,आमदार राजुरा यांच्या मार्फत मा.श्री.जितेंद्र आव्हाड,गृहनिर्माण मंत्री महाराष्ट्र राज्य यांना देण्यात आले.