दोन दिवसांपासून बेपत्ता मच्छीमाराचा इराई डॅममध्ये सापडला मृतदेह #irai - Khabarkatta ✒ खबरकट्टा

           Khabarkatta ✒ खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'

दोन दिवसांपासून बेपत्ता मच्छीमाराचा इराई डॅममध्ये सापडला मृतदेह #irai

Share This
खबरकट्टा /चंद्रपूर : 

मागील दोन दिवसांपासून बेपत्ता असलेल्या मच्छीमाराचा अखेर शोध लागला असून त्याचा इराई डॅममध्ये बुडून मृत्यू झाल्याचे समोर आले आहे. मृत मच्छीमारांचे नाव अभिजित  सरब्जित मंडल असे असून तो 26 वर्षाचा होता.


अभिजीत हा रविवारी सकाळी मासे पकडण्यासाठी येथे गेला होता मात्र तो परत आलाच नाही याबाबतची तक्रार त्याचे वडील सरब्जित मंडल त्याने दुर्गापुर स्टेशन मध्ये केली होती. दुर्गापूर पोलिसांनी काल दुपारी शोध मोहीम राबविली मात्र त्याचा मृतदेह मिळवण्यास अपयश आले आज सकाळी अभिजीतचा मृतदेह आढळून आला. 

पोलिसांनी पंचनामा करून शासकीय रुग्णालयात शवविच्छेदन करिता मृतदेह पाठविला असून दुर्गापुर पुलिस स्टेशनचे ठाणेदार मार्गदर्शनाखाली खोब्रागडे, पीएसआय प्रवीण सोनोने, अशोक मंजुळकर सुनील मेश्राम सुधीर कुंबरे मनोर जाधव ,पुढील तपास दुर्गापूर पोलिस करीत आहे.