आशिष ताजने यांचा भारतीय छात्र संसद,दिल्ली येथे सहभाग #indian studant parliament - Khabarkatta ✒ खबरकट्टा

           Khabarkatta ✒ खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'

आशिष ताजने यांचा भारतीय छात्र संसद,दिल्ली येथे सहभाग #indian studant parliament

Share This
खबरकट्टा / चंद्रपूर : 

नवी दिल्ली येथे एमआईटी पुणे तर्फे  आयोजित होत असलेल्या भारतीय छात्र संसदमध्ये भारतीय जनता युवा मोर्चाचे जिल्हा सचिव आशिष ताजने सहभागी झालेले आहे.

      
सुशिक्षित तरुणांनी सार्वजनिक जीवनात नेतृत्व  सांभाळण्यासाठी पुढे येण्याची गरज असून,जे  राजकारणापासून दूर गेले आहेत त्यांना मुख्य प्रवाहात आणणे.तसेच लोकशाहीला बळकटी देण्यासाठी राष्ट्रीय दृष्टी निर्माण करण्याच्या उद्देशाने देशातील तरुण वर्गला एकाच व्यासपीठावर जोडणे,तसेच देशातील सुरू घडामोडीवर विविध ठराव राष्ट्रीय अधिवेशनात संमत करून संबधित राज्य व केंद्र शासनाच्या विभागाकडे पाठविले जातात.तसेच देशातील विविध चालू घडामोडीवर दिगग्ज मान्यवर आपले मत व्यक्त करीत असतात.
    
आपल्या देशात व समाजात ज्या समस्या निर्माण होत असतात त्या लोकशाही मार्गाने राजकारणाच्या माध्यमातून सोडविल्या जाऊ शकते व ते सोडविण्यासाठी आपल्या देशातील सुशिक्षित युवा पिढी राजकारणात सक्रिय होणे आवश्यक आहे, जर आपण राजकारणात सक्रिय सहभागी नाही झालो तर आपल्या समाजात ज्या  समस्या निर्माण होत असतात त्यासाठी आपण दुसऱ्यांना दोष देत असतो परंतु आपणच जर राजकारणात सक्रिय असलो तर त्या समस्या आपल्याकडून सोडविल्या जाऊ शकतात.
            

भारतीय छात्र संसद या अधिवेशनाचा मुख्य उद्देश हाच आहे की,तरुणांनी राजकारणात सक्रिय होऊन समाजात परिवर्तन करावे व त्याच्या बळकटीसाठी प्रयत्न करावे.

हे सदर अधिवेशनाचे १० वे वर्ष असून विज्ञान भवन दिल्ली येथे २० ते २३ फेब्रूवारी पर्यत आयोजित केले आहे.