हिंगणघाट जळीत प्रकरण: पीडित तरुणी व्हेंटिलेटरवर, प्रकृती आणखी खालावली #hinganghatvictim - Khabarkatta ✒ खबरकट्टा

           Khabarkatta ✒ खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'

हिंगणघाट जळीत प्रकरण: पीडित तरुणी व्हेंटिलेटरवर, प्रकृती आणखी खालावली #hinganghatvictim

Share This
पीडितेला श्वास घ्यायला त्रास होत असल्याने तिचे व्हेंटिलेटर कायम ठेवण्यात आले आहे. तिचा युरिन आऊट चांगला आहे.


खबरकट्टा / महाराष्ट्र  : नागपूर -

माणुसकीला काळीमा फासणारी आणि अवघ्या महाराष्ट्राचं मन सुन्न करणारी घटना वर्धा जिल्ह्यातील हिंगणघाट येथे घडली. तासिका तत्त्वावर काम करणाऱ्या शिक्षिकेला पेट्रोल टाकून जाळण्याचा प्रयत्न विकी नगराळे या युवकाने केला. यात गंभीर अवस्थेत जळाल्याने, पीडितेला नागपूरच्या ऑरेंज सिटी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. उपचाराच्या सहाव्या दिवशी ऑरेंज सिटी रुग्णालयाच्या डॉक्टरांनी मेडिकल बुलेटीन जाहीर केले. त्यानुसार पीडित तरुणी व्हेंटिलेटरवर असून तिची प्रकृती आणखी खालावली आहे.

हिंगणघाट जळीत प्रकरणातील पीडितेची कालपेक्षा आज परिस्थिती खालावली असून मध्यरात्रीपासून पीडितेला व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आल्याची माहिती डॉ.राजेश अटल यांनी दिली. काल रात्री पीडितेच्या शरीरातील ऑक्सिजनची मात्रा कमी झाल्याने तिला व्हेंटिलेटर लावण्यात आले आहे. औषधांची मात्रा वाढवण्यात आल्याने संसर्ग नियंत्रणात आहे. पीडितेची प्रकृती नाजूक असल्याने आज मलमपट्टी करण्यात येणार नाही, परंतु पीडितेला शुक्रवारी पोषणनलिका टाकण्यात आली होती. त्यामुळे आजपासून नळीच्या माध्यमातून जेवण देण्यास सुरुवात केली आहे, अशी माहिती डॉक्टरांनी दिली. 


पोषणनलिकेद्वारे देण्यात येणाऱ्या जेवणाला देखील पीडित सकारात्मक प्रतिसाद देत आहे. सोबतच पीडित तरुणी पूर्णपणे शुद्धीवर असून प्रतिक्रिया देत आहे सोबतच आज डोळे मिटल्यावर असून दृष्टी कायम असल्याचे डॉक्टरांनी सांगितले. 

मेडिकल बुलेटिन @5pm :डॉ.दर्शन रेवनवार यांनी दिलेली माहिती अशी की, पीडितेला श्वास घ्यायला त्रास होत असल्याने तिचे व्हेंटिलेटर कायम ठेवण्यात आले आहे. तिचा युरिन आऊट चांगला आहे. डोळ्याचा भाग सध्या स्थितीत बरोबर आहे, दृष्टी कायम आहे. प्रकृतीत फार सुधारणा नाही परिस्थिती तशीच आहे. काही सुधार होत आहे. ऑपरेशन आज करणार होतो ते उद्याला करणार अशी माहिती दिली. कृत्रिमरित्या जेवण देत आहोत ते व्यवस्थित घेत नाही. तिची शारीरिक आणि मानसिक साथ मिळाली तर एक ते दीड महिन्यात तिला आम्ही या चक्रव्यूहमधून बाहेर काढू, अशी अपेक्षा व्यक्त केली. 

दरम्यान पीडितेच्या कुटुंबीयांची आर्थिक परिस्थिती हालाखीची असल्याने उपचाराचा खर्च शासनाने करावा अशी मागणी होती राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी तातडीने रुग्णालयात जाऊन भेट घेतली. रुग्णालयाने उपचारासाठी 11 लाख 90 हजार रुपयाचे इस्टिमेट दिले.त्यानुसार उपचाराचा पहिला हप्ता चार लाख रुपये रुग्णालयाच्या खात्यात जमा करण्यात आला आहे.
ऑरेंज सिटी रुग्णालय येथे स्पेशल कक्ष : हिंगणघाट येथील जाळीत प्रकरणातील पीडितेवर नागपूरच्या ऑरेंज सिटी रुग्णालय उपचार सुरू असून प्रकृती स्टेबल असली तरी क्रिटिकल असल्याचे डॉक्टरांचे मत आहे पीडितेला इन्फेक्शन होऊ नये म्हणून रुग्णालयात स्पेशल कक्ष तयार करण्यात आला असून त्या ठिकाणी दोन डॉक्टर व 7 नर्सेसची 24 तास नेमणूक करण्यात आलेली आहे. पीडितेला वाचवण्याचे डॉक्टरांचे शर्थीचे प्रयत्न सुरू असल्याचे सांगितले.