हिंगणघाट शिक्षिका जळीत प्रकरण फास्टट्रॅक कोर्टात : सरकारी वकील उज्ज्वल निकम यांची नियुक्ती #hinganghat #वर्धा #ujjwalnikam - Khabarkatta ✒ खबरकट्टा

           Khabarkatta ✒ खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'

हिंगणघाट शिक्षिका जळीत प्रकरण फास्टट्रॅक कोर्टात : सरकारी वकील उज्ज्वल निकम यांची नियुक्ती #hinganghat #वर्धा #ujjwalnikam

Share This
खबरकट्टा / महाराष्ट्र  : नागपूर -

हिंगणघाट येथील जळीत प्रकरणातील आरोपीला कठोर शिक्षा झाली पाहिजे, यासाठी हे प्रकरण जलदगती न्यायालयात सुनावणीसाठी वर्ग करण्यात येईल. तसेच पीडितेच्या आई –वडीलांच्या विनंतीवरुन सरकारी वकील उज्ज्वल निकम यांना नियुक्त करण्यात येईल, असे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी आज येथे सांगितले.


नागपुरातील ऑरेंज सिटी रुग्णालय व वैद्यकीय संशोधन केंद्रात या पीडितेवर उपचार सुरु आहेत.पीडितेच्या प्रकृतीची पाहणी केल्यानंतर गृहमंत्री श्री. देशमुख बोलत होते. पीडितेच्या उपचाराचा संपूर्ण खर्च राज्य शासन करणार आहे. तसेच आंध्र प्रदेश राज्याने केलेल्या कायद्याचा अभ्‌यास करण्‌यासाठी वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांसोबत आंध्र प्रदेशात जाणार असल्याचे गृहमंत्री श्री. देशमुख यांनी सांगितले.

हिंगणघाट येथील घडलेली घटना ही अतिशय निंदनीय असून, माणुसकीला काळीमा फासणारी आहे, असे सांगत गृहमंत्री श्री. देशमुख यांनी या घटनेचा तीव्र शब्दात निषेध केला.

ऑरेंज सिटी रुग्णालयात पीडितेवर उपचार सुरु असून, ती उपचारांना चांगला प्रतिसाद देत आहे. पीडितेवर नंतर प्लॅस्टिक सर्जरी कराव्या लागतील.सध्या तिची प्रकृती गंभीर पण स्थिर आहे. पुढील सात दिवसांमध्ये पीडितेच्या प्रकृतीबद्दल चित्र स्पष्ट होईल, असे डॉ. केशवानी यांनी सांगितले. 
ऑरेंज सिटी रुग्णालयाचे संचालक डॉ. सुनील केशवानी यांनी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यासोबत पीडितेच्या प्रकृतीची पाहणी केली. त्यावेळी ते बोलत होते. पोलिस आयुक्त डॉ. भूषण कुमार उपाध्याय, वर्धाचे जिल्हाधिकारी विवेक भिमनवार, डॉ. राजेश अटल आणि डॉ. अनूप मरार यावेळी उपस्थित होते.