नारंडा येथे गुरुदेव सेवा भजन मंडळला हार्मोनियम पेटी भेट : अँड.संजय धोटे यांच्या माध्यमातून आशिष ताजने यांचे सहकार्य #harmonium - Khabarkatta ✒ खबरकट्टा

           Khabarkatta ✒ खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'

नारंडा येथे गुरुदेव सेवा भजन मंडळला हार्मोनियम पेटी भेट : अँड.संजय धोटे यांच्या माध्यमातून आशिष ताजने यांचे सहकार्य #harmonium

Share This
खबरकट्टा / चंद्रपूर : कोरपना -

            
कोरपना तालुक्यातील नारंडा येथे राजुरा विधानसभा क्षेत्राचे माजी आमदार अँड.संजयभाऊ धोटे यांच्या माध्यमातून भाजयुमो जिल्हा सचिव आशिष ताजने यांच्या पुढाकाराने गुरुदेव सेवा भजन मंडळ यांना पेटी भेट देण्यात आली आहे.
             
गुरूदेव सेवा भजन मंडळ हे नारंडा गावात व परिसरातील गावात गेल्या अनेक वर्षांपासून भजनाचे कार्यक्रम करीत आहे.तसेच भजनाच्या  माध्यमातून समाज प्रबोधनाचे कार्यसुद्धा करीत आहे, गुरुदेव सेवा भजन मंडळाचे भजनाचे कार्यक्रम हे सतत वर्षभर सुरू असते,परंतु भजन मंडळाकडे व्यवस्थित पेटी नसल्यामुळे भजन करताना अडचण निर्माण होत होती त्यामुळे सदर मंडळाच्या पदाधिकारी यांनी भाजयुमो जिल्हा सचिव आशिष ताजने यांची भेट घेऊन पेटी संदर्भात मागणी केली होती त्याअनुषंगाने पेटी ही गुरूदेव सेवा भजन मंडळास पेटी उपलब्ध करून देण्यात आली आहे.
         
यावेळी भाजयुमो जिल्हा सचिव आशिष ताजने,माजी सरपंच वसंतराव ताजने,भाजपा शक्ती केंद्र प्रमुख सत्यवान चामाटे,बूथ प्रमुख अनिल मालेकर,प्रवीण हेपट,ग्रामपंचायत सदस्य मायाताई शेंडे,कालीफनाथ लांडगे,विलास कोडापे,चंद्रशेखर निंदेकर,बाळा निंदेकर, योगेश बोढे,चंद्रभान निमकर,सुरेश शेंडे,गणपत निवलकर,दिनकर वाढई, फकरू शेंडे,मिन्नाथ मोहूर्ले, भारत ठाकरे,प्रवीण वांढरे,मोहन चौधरी,शंकर वाढई,वैशाली निंदेकर,रुंदाताई काळे,तानेबाई सहस्त्रबुद्धे,नानेबाई वाढई उपस्थित होते.