देवतळे कुटुंबियांतर्फे श्रद्धांजलीपर कार्यक्रमातून समाजप्रबोधन : सृतिप्रित्यर्थ अन्नदानाकरीता रोख रक्कम प्रदान #gurudev seva mandal - Khabarkatta ✒ खबरकट्टा

           Khabarkatta ✒ खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'

देवतळे कुटुंबियांतर्फे श्रद्धांजलीपर कार्यक्रमातून समाजप्रबोधन : सृतिप्रित्यर्थ अन्नदानाकरीता रोख रक्कम प्रदान #gurudev seva mandal

Share This
खबरकट्टा / चंद्रपूर : राजुरा -
राजुरा तालुक्यातील सुमठाणा गावातील सौ.कांताबाई वामनराव देवतळे यांच्या दुख:द निधनाबद्दल कुटुंबीयाचे वतिने श्रद्धांजलीपर समाजप्रबोधन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी सेवा मंडळाचे केंद्रिय सदस्य ॲड राजेंद्र जेनेकर होते तर मार्गदर्शक म्हणून लटारु मत्ते मुख्या, सुभाष पावडे संघटक,सौ.कुंदा जेनेकर सदस्या पं.स.राजुरा, नानाजी डोंगे, रामदास चौधरी,आबाजी ढवस, उद्धवराव भोजेकर,बाबुराव पहानपटे मु.अ,देवराव परसुटकर,मधुकर मटाले यांची उपस्थिती होती.
श्री गुरुदेव सेवा मंडळाचे ग्रामसेवाधिकारी वामनराव देवतळे यांनी प्रास्ताविक केले,भेंडाळा भजन मंडळाने सुमधूर भजन गायण करुन उपस्थितांना मंत्रमुग्ध केले, त्यानंतर आबाजी ढवस,सौ.कुंदा जेनेकर,सुभाष पावडे यांनी समयोचित विचार व्यक्त केले.
कार्यक्रमाध्यक्ष अँड.राजेंद्र जेनेकर यांनी दिवंगत कांताबाई देवतळे यांच्या आठवणी सांगत वातावरण भावविभोर केले व रुढी परंपरेच्या बंधनातून निघून श्री गुरुदेव सेवा मंडळाची परिवर्तनशील विचार आत्मसात करावे असे विचार व्यक्त केले.


याप्रसंगी प्रविण देवतळे,सौ.वैशाली आगलावे,सचिन देवतळे या भावंडांनी मातोश्रीच्या स्मृतिप्रीत्यर्थ गुरुकुंज आश्रमातील अन्नदान योजनेकरीता 2100/- रक्कम प्रदान करण्यात आली तसेच उपस्थित नातेवाईकांना ग्रामगीता ग्रंथाचे वितरण करण्यात आले,श्रद्धांजली अर्पण करुन राष्ट्रवंदनेने समारोप करण्यात आला.सुत्रसंचालन बाबुराव पहानपटे यांनी तर मधुकर मटाले यांनी आभार मानले.