बल्लापुरात गुप्तधनासाठी खोदकाम : नरबळी कायदा अंतर्गत चार आरोपीनां अटक #guptdhan - Khabarkatta ✒ खबरकट्टा

           Khabarkatta ✒ खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'

बल्लापुरात गुप्तधनासाठी खोदकाम : नरबळी कायदा अंतर्गत चार आरोपीनां अटक #guptdhan

Share This
खबरकट्टा / बल्लारपुर ( चंद्रपूर) : 


बल्लारपूर शहरात महाराष्ट्र नरबळी कायदा अंतर्गत चार आरोपीनां अटक करण्यत आले. यात हरि गोरेलाल वर्मा (३९), अनिता हरि वर्मा (३५) राहणार सुभाष वार्ड, जुबेदा पंकज तायडे (५५) राहणार दुर्गापुर आणि राजेश बिराबोयना (पंडित) राहणार कागज नगर हे चार आरोपी गुप्त धन शोधन्याकरिता बल्लारपुर येथिल सुभाष वार्डात एका घरात खोदकाम करित होते.

शेजारीनां खोदकाम बाबतीत आवाज आल्यने याची सुचना बल्लारपुर पोलीस स्थानकात देण्यात आली. बल्लारपुर पोलीस पथक मोक्यावर पोहोचून या ४ आरोपीला अटक केले. तसेच मोक्यावरूण लाल कापड, खोदकामाकरिता वापरण्यात आलेल्या पावडा आणि पुजेचे साहित्य सापडल्या होत्या. या चारही ही आरोपीवर महाराष्ट्र नरबळी कायदा - २, अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आले. व पुढी़ल तपास साहय्यक पोलीस निरिक्षक महेन्द्र जोशी करित आहे.