पाच दिवसांच्या आठवड्याचे नियम जाहीर ! #government servent - Khabarkatta ✒ खबरकट्टा

           Khabarkatta ✒ खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'

पाच दिवसांच्या आठवड्याचे नियम जाहीर ! #government servent

Share This
खबरकट्टा / महाराष्ट्र :
राज्यातील सरकारी कर्मचाऱ्यांसाठी पाच दिवसांचा आठवडा लागू करण्याचा निर्णय सरकारने जाहीर केल्यानंतर आता त्याच्या नियमांचा जीआर (शासन निर्णय) 24 फेब्रुवारी रोजी काढण्यात आला आहे.


5 दिवसांचा आठवडा कोणास लागू नसेल हे तर स्पष्ट केलेले आहेच, शिवाय पाच दिवसांचा आठवडा लागू असणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या कामकाजाची वेळही निश्चित करण्यात आली आहे.

▪ 29 फेब्रुवारी, 2020 पासू शासकीय कार्यालयांसाठी पाच दिवसांचा आठवडा लागू करण्यात येत असून त्यामुळे सर्व शनिवार व रविवार हे सुट्टीचे दिवस असतील.

▪ सर्व शासकीय कार्यालयांच्या कामकाजाची वेळ 45 मिनिटांनी वाढवण्यात येत असून ती सोमवार ते शुक्रवार सकाळी 9.45 ते सायंकाळी 6.15 अशी राहील.

▪ सर्व शासकीय कार्यालयांतील शिपायांसाठी कामकाजाची वेळ सोमवार ते शुक्रवार सकाळी 9.30 ते सायांकाळी 6.30 अशी राहील.

▪ शासन निर्णयानुसार दुपारी 1.00 ते 2.00 या वेळेमधील जास्तीत जास्त अर्ध्या तासाची भोजनाची सुट्टी अंतर्भुत असेल.

▪ यांना हा नियम लागू नाही

ज्या शासकीय कार्यालयांना कारखाना अधिनियम लागू आहे किंवा औद्योगिक विवाद अधिनियम लागू आहे किंवा ज्याांच्या सेवा अत्यावश्यक म्हणून समजल्या जातात, अशा कार्यालयांना व शासकीय महाविद्यालये, तंत्रनिकेतने, शाळा, पोलीस दल, अग्निशमन दल, सफाई कामगार इ. यांना पाच दिवसांच्या आठवड्याबाबतचे आदेश लागू राहणार नाहीत.

अशा प्रकारच्या कार्यालयांची यादीही सरकारने जाहीर आहे. या यादीत दिलेल्या प्रकारात मोडणाऱ्या इतर कार्यालयांनासुद्धा पाच दिवसांचा आठवडा लागू राहणार नाही.