मतिमंद तरुणीवर पाच नरधमांचा अत्याचार : गडचिरोली जिल्ह्यातील घटना : महिला अत्याचार सत्र थांबेना #gadchiroli - Khabarkatta ✒ खबरकट्टा

           Khabarkatta ✒ खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'

मतिमंद तरुणीवर पाच नरधमांचा अत्याचार : गडचिरोली जिल्ह्यातील घटना : महिला अत्याचार सत्र थांबेना #gadchiroli

Share This
खबरकट्टा / गडचिरोली - 


आरमोरी तालुक्यापासून २२ किलोमीटर अंतरावर असलेल्या गावात पाच नराधमांनी मतिमंद व शारीरिक विकलांग असलेल्या १९ वर्षीय तरुणीवर बलात्कार केल्याची घटना उघडकीस आली असून शनिवारी रात्री या संदर्भात आरमोरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला असून पाचही आरोपींना अटक करण्यात पोलिसांना यश मिळाले आहे.

आरमोरी पोलिस स्टेशनमध्ये दाखल तक्रारीनुसार यातील फिर्यादी महिलेची पुतणी (वय १९ वर्षे) ही मतिमंद व मानसिक विकलांग आहे. मागील एक वर्षाच्या काळात पीडितेच्या शारीरिक व मानसिक विकलांगतेचा गैरफायदा घेत व तिच्यासोबत कोणी नसल्याची संधी साधून पाच नराधमांनी तिच्यावर वेगवेगळ्या ठिकाणी नेऊन कधी शेतात तर कधी घरी बलात्कार केला.


या प्रकरणातील आरोपीमध्ये गावातील तीन व बाहेरगावचे दोन असे एकूण पाच आरोपी आहेत. या पाचही आरोपींनी वेगवेगळ्या वेळेस मतिमंद मुलीला एकटे गाठून वेगवेगळी आमिषे दाखवून वेगवेगळ्या ठिकाणी नेऊन तिच्यावर बलात्कार केला. या प्रकरणाची माहिती कुठे दिली तर जिवानिशी ठार करू, अशी धमकी त्या नराधमांनी पीडितेला दिली होती. सदर मतिमंद तरुणी ही पाच महिन्याची गरोदर राहिल्याने तिच्या घरच्यांनी तिची वैद्यकीय तपासणी केली असता सदरचा प्रकार उघडकीस आला.


बलात्कार प्रकरणातील आरोपीमध्ये देविदास मनीराम कुमरे (वय ३५ वर्षे), दिगंबर विश्‍वनाथ दुर्गे (वय ५२ वर्षे), विजय गजानन कुमरे (वय २९ वर्षे), सुधाकर तुळशीराम कुमोटी (वय ४५ वर्षे) व मेघशाम नामदेव पेंदाम (वय २४ वर्षे) अशी आरोपींची नावे आहेत. त्यांच्यावर कलम ३७६ (२), ५0६ भादंविनुसार नोंद करून त्यांना तात्काळ अटक केली आहे. या प्रकरणाचा तपास आरमोरी पोलिस स्टेशनचे पोलिस अधिकारी पंकज बोडसे व चेतनसिंग चव्हाण हे करीत आहेत.