चंद्रपूर ब्रेकिंग : विद्यार्थ्यांना विषबाधा.. !! अन्नपूर्णा स्वीट मार्ट चा शिळा केक खाणे आले जीवावर !!! #foodpoisoning - Khabarkatta ✒ खबरकट्टा

           Khabarkatta ✒ खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'

चंद्रपूर ब्रेकिंग : विद्यार्थ्यांना विषबाधा.. !! अन्नपूर्णा स्वीट मार्ट चा शिळा केक खाणे आले जीवावर !!! #foodpoisoning

Share This
खबरकट्टा / चंद्रपूर : थोडक्यात 

शहरातील बागला हायस्कूल मध्ये शिकणाऱ्या 6 व्या वर्गातील 15 विद्यार्थ्यांना शिळा केक खाल्ल्याने तब्बल  जणांना विषबाधा झाल्याची घटना आज 28 फेब्रुवारी ला घडली. शिक्षकांच्या सतर्कतेने तात्काळ दवाखाना गाठल्याने विद्यार्थी जरी बचावले असले तरीही विषबाधेच्या गंभीर परिणामांना विद्यार्थ्यांना सामोरे जावे लागले. 

सविस्तर वृत्ता नुसार आज 28 फेब्रुवारी ला बागला हायस्कूल मधील 6 व्या वर्गात शिकणाऱ्या वर्गात शिकणाऱ्या 2 विद्यार्थिनींचा वाढदिवस असल्याने चिमुकल्यानी केक कापून वाढदिवस साजरा करण्याचे ठरविले. ठरल्याप्रमाणे विद्यार्थ्यांनी बागला चौकातील अन्नपूर्णा स्वीट मार्ट मधून केक घेतला व वर्गात केक कापून दोघांचा वाढदिवस साजरा केला.

परंतु 15 मिनीटांनी एकूण 15 विद्यार्थ्यांना पोटदुखी व उलट्या व्हायला लागल्या, अचानक घडलेला प्रकार बघता शिक्षकांनी तात्काळ सर्व विद्यार्थ्यांना जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचारासाठी नेले, त्यात 9 मुले व 6 मुली यांच्यावर डॉक्टरांनी औषधोपचार केले. 

सायंकाळ पर्यन्त 9 विद्यार्थ्यांना सुट्टी देण्यात आली तर 6 विद्यार्थिनी अजूनही रुग्णालयात उपचार घेत आहे. विद्यार्थ्यांनी सांगितले की केक हा शिळा असल्या कारणाने आम्हाला खूप त्रास झाला. अन्नपूर्णा स्वीट मार्ट मधील हा केक शिळा होता . आज या घटनेने औषध व अन्न प्रशासनाच्या कार्यप्रणालीवर संशय निर्माण झाला आहे.