शिक्षण आणि कलेतून विद्यार्थी घडतात : आमदार धर्मराव बाबा आत्राम यांचे प्रतिपादन : डीबीए पब्लिक स्कुलचे स्नेहसंम्मेलन #dharamraobabaatram - Khabarkatta ✒ खबरकट्टा

           Khabarkatta ✒ खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'

शिक्षण आणि कलेतून विद्यार्थी घडतात : आमदार धर्मराव बाबा आत्राम यांचे प्रतिपादन : डीबीए पब्लिक स्कुलचे स्नेहसंम्मेलन #dharamraobabaatram

Share This
खबरकट्टा / अहेरी :


विद्यार्थी हे शिक्षण आणि कलेतूनच घडत असतात.शिक्षणातून बुद्धीचा तर कलेतून व्यक्तिमत्त्वाचा विकास होतो असे प्रतिपादन माजी राज्यमंत्री तथा विद्यमान आमदार धर्मराव बाबा आत्राम यांनी केले.
     
ते मंगळवार 11 फेब्रुवारी रोजी स्नेहा लॉन्स अहेरी मैदानावर धर्मराव बाबा आत्राम, (डी.बी.ए.) पब्लिक स्कुलच्या  स्नेह संम्मेलनात उदघाटन स्थानावरून बोलत होते.
    
समारंभाच्या अध्यक्षस्थानी उपविभागीय पोलीस अधिकारी बजरंग देसाई होते.तर प्रमुख अतिथी म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे महिला कार्याध्यक्ष शाहीन हकीम, सामाजिक कार्यकर्ते बबलू हकीम, शाळेचे अध्यक्ष तथा सिनेट सदस्या तनुश्रीताई आत्राम, पं.स.सदस्य हर्षवर्धनराव बाबा आत्राम, केंद्र प्रमुख सुधाकर घोसरे आदी मान्यवर उपस्थित होते.


      
उदघाटन स्थानावरून पुढे बोलतांना आमदार धर्मराव बाबा आत्राम म्हणाले की, शिक्षण व कला विद्यार्थ्यांमध्ये आत्मसाद झाले की, व्यक्तिमत्त्व विकासापासून त्यांना कोणीच रोखू शकत नाही, सुप्त गुणांतून विद्यार्थ्यांची खरी ओळख होते त्यामुळे शिक्षण आणि विध्यार्थी घडत असतो असे म्हणत शालेय व चिमुकल्या बालकांना मोलाचे मार्गदर्शन केले.
    
या प्रसंगी शाहीन हकीम आणि तनुश्रीताई आत्राम यांनी सुद्धा उपस्थित विद्यार्थी व पालकांना योग्य मार्गदर्शन केले.त्या नंतर डी.बी.ए.विद्यालयातील शालेय विद्यार्थी नृत्य सादर करून उपस्थितांना रिझविले. विशेष म्हणजे गत 26 जानेवारी प्रजासत्ताक दिनी प्रशासकीय कार्यक्रमातील सांस्कृतिक कार्यक्रमात डी.बी.ए.स्कुल अव्वल ठरले होते.


     
कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राचार्य मनीष दाभाडे यांनी तर संचालन हिना पठाण, शिरीन शेख ह्यांनी केले उपस्थितांचे आभार लक्ष्मी रामटेके  यांनी मानले. यावेळी विद्यार्थी, पालक, शिक्षकवृंद व बहुसंख्येने नागरिक उपस्थित होते.