चंद्रपूर बिग ब्रेकिंग : शेतशिवारात आढळला अनोळखी इसमाचा कुजलेला मृतदेह : घटना पंचनाम्यावरून घातपाताची शक्यता : ओळख पटविण्याचे पोलिसांसमोर आव्हान.... !!! #dead body found in forest - Khabarkatta ✒ खबरकट्टा

           Khabarkatta ✒ खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'

चंद्रपूर बिग ब्रेकिंग : शेतशिवारात आढळला अनोळखी इसमाचा कुजलेला मृतदेह : घटना पंचनाम्यावरून घातपाताची शक्यता : ओळख पटविण्याचे पोलिसांसमोर आव्हान.... !!! #dead body found in forest

Share This
खबरकट्टा / चंद्रपूर : कोरपना -गडचांदूर प्रतिनिधी : हबीब शेख 


कोरपना तालुक्यातील खैरगाव  काटेरी झुडुपामध्ये आज  अनोळखी इसमाचा मृतदेह आढळल्याने एकच खळबळ उडाली आहे.देवराव मडावी बकरी चारण्यासाठी जंगलात गेले असता त्यांना मृतदेह दिसताच यांची माहिती खैरगाव येथील पोलीस पाटील नंदकिशोर कोरडे यांना देण्यात आली.  घटनास्थळी पोलीस दाखल झाले आहेत.खैरगाव गावानजीक झुडपामध्ये मृतदेह असल्याची माहिती गडचांदुर पोलिसांना मिळताच पोलीस ताफा घटना स्थळी पोहचला पोलिसांनी पंचनामा केला अनोळखी इसमाचे अंदाजे वय 35-40 असुन इसमाच्या हातावर  सतोष असे गोंदलेले आढळुन आले आहे अंगामध्ये  फीकट निळा पँन्ट परीधान केलेला असुन पायात सैन्डल चपल आहे सदर इसमाजवळ कोणतेही आेळखीचे कागद पत्रे सापडले नाही.नागरिकांन मध्ये सदर इसमाची घातपात झाला असल्याची  चर्चा चालु होती तरी सदर  इसमाची ओळख पटविण्याचे अव्हान गडचांदुर पोलीसांन समोर ठाकलेले आहे तरी वरील इसमाची ओळखत असल्यास माहिती द्यावी.असे आव्हान गडचांदुर पोलीसां स्टेशन ठाणेदार गोपाल भारती यांनी केले आहे.