दोन लाख सत्ताविस हजार रुपयांचा दारुसाठा जप्त : राजुरा पोलीसाची कारवाई #darubandi - Khabarkatta ✒ खबरकट्टा

           Khabarkatta ✒ खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'

दोन लाख सत्ताविस हजार रुपयांचा दारुसाठा जप्त : राजुरा पोलीसाची कारवाई #darubandi

Share This
खबरकट्टा / चंद्रपूर : राजुरा -

राजुरा खबर्‍याच्या खबरे वरुन एका चारचाकी वाहनात अवैध दारू येत असल्याची माहिती राजुरा पोलीसांना मिळाली. माहितीच्या आधारे पोलिसांनी नांदगाव सुर्या येथे सापळा रचून येणार्‍या वाहनांला अडविले. या वाहनांची झडती घेतली असता वाहनामघ्ये दारुसाठा आढळून आला.

संत्रा देशी कंपनीचे १८० एमएल चे ३३६ नग किंमत ६७२०० रू. व ९० एमएल चे १०० नग किंमत १०००० रू. व दिड लाख रुपये किमतीचे वाहन एकुण दोन लाख सत्ताविस हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. सुनील भाऊराव गोरे (३६) असे आरोपीचे नाव आहे. अवैधरित्या दारुसाठी वापरण्यात येणार्‍या एम.एच.३१ बी.बी.५५७० क्रमांकाचे वाहनं राजुरा पोलीसांनी ताब्यात घेतले व आरोपी विरुद्ध अप क्रं १४८/२०२० (६५) (अ) दारुबंदी कायद्याअंतर्गत राजुरा पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला असून पुढील तपास राजुरा पोलिस करीत आहेत. 

या मोहिमेत पोलिस निरीक्षक नरेंद्र कोसुर कर यांच्या मार्गदर्शनाखाली प्रशान्त साखरे गुन्हा अन्वेषण शाखेचे गोडसे, खुशाल टेकाम, विठ्ठल नवले, नरोटे दत्ता नांगरे या मोहिमेत सहभागी होतें.