लग्न समारंभात अतिमद्य सेवनाने एसटी चालकाचा मृत्यू ! #darubandi - Khabarkatta ✒ खबरकट्टा

           Khabarkatta ✒ खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'

लग्न समारंभात अतिमद्य सेवनाने एसटी चालकाचा मृत्यू ! #darubandi

Share This
खबरकट्टा / चंद्रपूर :सिंदेवाही –


सिंदेवाही तालुक्यातील गुंजेवाही येथे पुतणीच्या लग्न समारंभात आलेल्या एसटी महामंडळातील वाहनचालकाचा दारू पिऊन मृत्यु झाल्याची घटना 3 फेब्रुवारीला घडली.


पुतनीच्या लग्नात हजेरी लावण्यासाठी 29 जानेवारीला कैलास प्रभाकर नैताम, एसटी वाहनचालक काटोल, डेपो जिल्हा नागपूर हे गुंजेवाही आपल्या परिवारासोबत सोबत आले होते.लग्न समारंभात हजेरी लावल्यापासूनच त्यांनी सतत मद्यपान सुरु केले होते याचा अतिरेक होऊन त्यांचा मृत्यू 3 फेब्रुवारीला नातेवाईक बाबुराव मडावी यांचे घरी झाला.


दारूबंदीच्या जिल्ह्यातच अतिमद्य सेवनाने झालेला या मृत्यू मुळे पुन्हा एकदा दारूबंदी विषय चर्चेत आहे.जिल्ह्यातील दारूबंदी हटविन्याकरिता पालकमंत्र्यांनी समीक्षा समिती स्थापन केली असून पुढील एका महिन्यात ही समिती अहवाल सादर करणार आहे.

प्रकरणाचा पुढील तपास सिंदेवाही पोलीस स्टेशनचे ठाणेदार रामटेके करीत आहे.