चंद्रपूर ब्रेकिंग : नायब तहसीलदारांच्या वाहनाला रेती तस्कारानी चिरडले : वाहनाचा अक्षरशः झाला चेंदामेंदा : जिल्ह्यात अवैध तस्करांचा वाढता हौदोस #crushed the vehicle of the Naib Tehsildar - Khabarkatta ✒ खबरकट्टा

           Khabarkatta ✒ खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'

चंद्रपूर ब्रेकिंग : नायब तहसीलदारांच्या वाहनाला रेती तस्कारानी चिरडले : वाहनाचा अक्षरशः झाला चेंदामेंदा : जिल्ह्यात अवैध तस्करांचा वाढता हौदोस #crushed the vehicle of the Naib Tehsildar

Share This
खबरकट्टा / चंद्रपूर : पोंभुर्णा -


पोंभूर्णा तालुक्यात अवैद्य अवैद्य रेती तस्करीवर आळा घालण्याच्या उद्देशाने निघालेल्या पोंभूर्णा महसूल विभागाच्या चार चाकी वाहनाला (एमएच ३४ बिएफ ४४८८) महिंद्रा ट्रॅक्टरने समोरून व मागून धडक देऊन जीवे मारण्याचा प्रयत्न केल्या गेला. 

ही घटना पोंभुर्णा तालुक्यातील  देवाडा बुज जवळ रात्री सुमारे एक ते दोन वाजताच्या दरम्यान घडली.राहुल पाल (३६)रा.देवाडा बूज. असे आरोपीचे नांव असुन त्याला त्याच्या घरातून सकाळी अटक करण्यात आली आहे. 

घटनेत वापरलेली ट्रॅक्टर आरोपी राहुल पाल यांच्या स्वतःच्या मालकीची असल्याचे समजते.पोंभूर्णा तालुक्यात सध्या अवैद्य रेती तस्करीला उधान आले असून डझनभर ठिकाणाहून रेतीची रात्रभर तस्करी केल्या जाते.तालुक्यातील जुनगांव लगतच्या वैनगंगा नदीपात्रातुन अवैद्य रेती तस्करी होत असल्याची कुणकुण लागताच पोंभूर्णा महसूल विभागाचे पाच सदस्यीय भरारी पथक रात्री जुनगांव पर्यंत गेले होते. परंतु रेती तस्करांचा ' नेटवर्क ' मजबूत असल्याने एकही रेती भरलेले वाहन पकडता आले नाही. 


जुनगांव वरून वापस येत असतांना देवाडा बुज व नांदगाव च्या मध्यंतरी एक ट्रॅक्टर उभे दिसल्याने भरारी पथकाने आपले वाहन आडोशाला उभे केले असताना अचानक ट्रॅक्टर चालकाने हमला चढविला.